शेतकरी गटाच्या महिलांची आगळी वेगळी वटपौर्णिमा

दत्ता म्हसकर
गुरुवार, 28 जून 2018

जुन्नर (पुणे) : डिसेंन्ट फाऊंडेशन, पुणे आणि सावित्रीबाई फुले महिला शेतकरी गट, गोळेगाव ता.जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता.27) वटपौर्णिमेचा सण शेतकरी महिलांनी आगळया वेगळ्या पद्धतीने साजरा केला. 

जुन्नर (पुणे) : डिसेंन्ट फाऊंडेशन, पुणे आणि सावित्रीबाई फुले महिला शेतकरी गट, गोळेगाव ता.जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता.27) वटपौर्णिमेचा सण शेतकरी महिलांनी आगळया वेगळ्या पद्धतीने साजरा केला. 

वटवृक्षाचे सामूहिक पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथील गृह विषयतज्ञ निवेदिता डावखर-शेटे यांनी 'महिलांसाठी रोजगाराच्या संधी' या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ.पल्लवी राऊत यांनी 'सर्पदंश प्रथमोपचार व उपचार' या विषयावर चित्रफितीद्वारे मार्गदर्शन केले. त्यांनी विषारी व बिनविषारी साप, सर्पदंश झाल्यावर कोणती काळजी घ्यावी व घर व परिसरात स्वच्छता राखावी याविषयी सविस्तर माहिती दिली. 

निवेदिता डावखर-शेटे यांनी लिहिलेल्या 'रक्तक्षय - आहार कारणे व प्रतिबंध उपाय' या पुस्तकाचे व रेन ट्री या वृक्षाच्या रोपांचे उपस्थित महिलांना वाटप करण्यात आले. 

महिलांसाठी 'भाग्यवान सावित्री', उखाणे स्पर्धा तसेच पारंपारिक पोषाख आदी स्पर्धा घेण्यात आल्या. यात  सुरेखा शेटे, सुचित्रा कोकणे व सुनंदा ताम्हाणे या महिला विजयी झाल्या. 

याप्रसंगी सरपंच शारदा लोखंडे, कविता बिडवई, माजी सरपंच ज्योती डोके, सावित्रीबाई फुले महिला शेतकरी गटाच्या अध्यक्ष पल्लवी डोके, उपाध्यक्षा छाया बिडवई, सचिव वृषाली ताम्हाणे, खजिनदार निकीता काळे,  ग्रामपंचायत सदस्या पल्लवी वाणी, सुनंदा मेहेर,  रेश्मा कोकणे, सुशीला शेटे, सुरेखा बिडवई, गिताबाई बिडवई, लता डोके, मंगल लोखंडे, ताराबाई लोखंडे,  रोहिणी डोके, सविता माळी आदी महीला मोठया संख्येने उपस्थित होत्या. 

प्रास्ताविक डिसेंन्ट फाऊंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी केले. सूत्रसंचलन फाऊंडेशनचे समन्वयक गणेश सुर्यवंशी यांनी केले. आभार शेतकरी गटाच्या अध्यक्षा पल्लवी डोके यांनी मानले.

Web Title: vatapornima in different way