'व्हॅटिकन'चे राजदूत म्हणतात, 'भारतात मानवी हक्कांचे उल्लंघन'

टीम ई-सकाळ
रविवार, 19 जानेवारी 2020

'जाती धर्मात अडकून न राहता जातिभेद न करणे ही काळाची गरज आहे. जगात फक्त एकच जात आहे, ती म्हणजे माणुसकी.'

पुणे : भारतात सध्या जातिवाद प्रचंड वाढलेला दिसत आहे. देशात हिंसा, मतभेद वाढत चालले असून, मानवी हक्काचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. परंतु, आपण सगळ्यांशी प्रेमाने वागले पाहिजे. जातीभेद न करता राष्ट्रउभारणीसाठी कार्य करायला हवे, असे मत 'व्हॅटिकन'चे भारतातील राजदूत जी. एम. बत्तीस्ता डीक्वाट्रो यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डायोसिस ऑफ पुणे आणि स्वच्छंद, पुणे यांच्यातर्फे आंतरधर्मीय सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन एम्प्रेस गार्डनजवळील बिशप हाऊस येथे करण्यात आले होते. या वेळी बोलताना डीक्वाट्रो म्हणाले, 'जाती धर्मात अडकून न राहता जातिभेद न करणे ही काळाची गरज आहे. जगात फक्त एकच जात आहे, ती म्हणजे माणुसकी. सर्वांच्या जीवनात आनंद ही एकच गोष्ट महत्वाची आहे. हाच आनंद मिळविण्यासाठी आपण सगळ्यांबरोबर प्रेमाने आणि आपुलकीने एकत्र राहिले पाहिजे. सर्व धर्मातील माणसे ही आपापल्या स्थानी चांगले कार्य करीत आहेत.' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे► क्लिक करा

या कार्यक्रमास पुणे धर्मप्रांताचे बिशप डॉ. थॉमस डाबरे, व्हीकार जनरल फादर माल्कम सिक्वेरा, फादर व्ही. लुईस, डीकन रॉय डिमेंटो, माजी महापौर प्रशांत जगताप, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, वसुधैव कुटुंबकमचे कृष्णा, राहुल डंबाळे, स्वच्छंद पुणेचे प्रा. रविंद्र शाळू आदी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vatican city ambassador in india said human rights violation india

टॅग्स
टॉपिकस