Vidhan Sabha 2019 : पुण्याच्या विकासाचा 'हा' आहे वंचितचा अजेंडा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 October 2019

विधासभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम आता वाढू लागली आहे. लहान- मोठ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते त्यासाठी अहोरात्र झटत आहे. संपूर्ण पुणे शहराच्या विकासासाठी, या राजकीय पक्षांचे मुद्दे कोणते असतील, या बाबतचा प्राधान्यक्रम वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष मुन्वर कुरेशी यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केला.

पुणे : विधासभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम आता वाढू लागली आहे. लहान- मोठ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते त्यासाठी अहोरात्र झटत आहे. संपूर्ण पुणे शहराच्या विकासासाठी, या राजकीय पक्षांचे मुद्दे कोणते असतील, या बाबतचा प्राधान्यक्रम वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष मुन्वर कुरेशी यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केला.

वंचित बहुजन आघाडी - चिन्ह गॅस सिलिंडर 
- युवकांना रोजगार मिळवून देणे 
- शहर आणि उपनगरांत पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा करणे 
- पर्यावरणाचे संतुलन राखताना प्रदूषण कमी करणे, नदी स्वच्छता आदी 
- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन प्रोत्साहन देणे 
- धर्म, जातीच्या नावाखालील हिंसाचार रोखण्यासाठी सलोखा निर्माण करणे 

..म्हणून बारामतीत वंचितचा उमेदवार करणार उपोषण?

पुरेसा निधी आणि नैसर्गिक स्त्रोत असले तरी नियोजनाअभावी शहर गेल्या काही वर्षांत बकाल होऊ लागले आहे. मूलभूत सुविधांपासूनही नागरिक वंचित आहे. तसेच सामाजिक सलोखाही धोक्‍यात आला आहे. त्यामुळे शहरामध्ये सुविधा निर्माण करतानाच सलोखा निर्माण करण्यावर आमचा प्रयत्न असेल, असे मुन्वर कुरेशी यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: VBA agenda for development of Pune In VidhanSabha Election