भ्रष्टाचार उघड होत असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून भाजप प्रवेश : प्रकाश आंबेडकर

भ्रष्टाचार उघड होत असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून भाजप प्रवेश : प्रकाश आंबेडकर

पुणे : आरक्षण मिळाल्यामुळे वंचित समाज सरकारी नोकऱ्यांमध्ये आला. आपल्या देशात वंचितांनी सत्तेत जाऊ नये, हा पायंडा आहे. आरक्षणाला धोका निर्माण झाला आहे, यासाठी आरक्षण वर्गानं सावध राहायला हवे, असे वंचित बहुजन आघडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भ्रष्टाचार उघड होत असल्याने त्यांच्याकडून भाजप प्रवेश केला जात आहे, असेही ते म्हणाले.  

सेनापती बापट रस्त्यावरील मुनोत कार्यालयात वडार समाज सत्ता संपादन मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाचे संयोजक अनिल जाधव, नवनाथ पडळकर, शांताराम धोत्रे, अनिल कुर्हाडे, सचिन दिवार, वडार समाजातील नागरिक उपस्थित होते.

ते म्हणाले, ईडीमार्फत जी चौकशी केली जाते, तो राजकीय स्टंट आहे. या चौकशीत काही तथ्य असते तर आत्तापर्यंत कित्येकांना अटक झाली असती. काँग्रेसला ऑफर दिली आहे, त्यांनी लवकर नाही कळवले तर आम्ही कोणासाठी थांबणार नाही, आगेकूच होऊ.

भ्रष्टाचार उघड होत असल्याने भाजप प्रवेश

वंचित बहुजन आघाडीकडून उपेक्षित समाजाला उमेदवारी देणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भ्रष्टाचार उघडा पडत आहे. म्हणून हे सगळे लोक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.

...तर आरक्षण बंद

ज्याप्रमाणे भाजप सरकारने मेहबूबा मुफ्ती यांचा सत्तेसाठी वापर केला. त्याप्रमाणे या सरकारकडून मतदारांचा वापर होऊ शकतो. सत्ता संपूर्ण भाजपच्या हातामध्ये आल्यास आरएसएसच्या लोकांना आरक्षण नसल्याने ते आरक्षण बंद करतील, असेही आंबेडकर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com