पितृ पंधरवड्यातही भाज्यांना ग्राहकांची प्रतीक्षा

Vegetable
Vegetable

पुणे - पितृ पंधरवडा असूनही सध्या भाजीपाल्याला मागणी कमी आहे. उत्पादन आणि आवक चांगली असल्याने भावही गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे.

पितृ पंधरवड्यात मेथी, देठ, कारली, भेंडी, गवार, लाल भोपळा, आळूची पाने व हिरवी काकडी या भाज्यांना मागणी वाढते. फळांमध्ये डाळिंब आणि पेरू यांना मागणी असते. बाजारात सध्या या भाज्या व फळांची आवक चांगली होत आहे. मात्र अपेक्षित मागणी नसल्याने त्यांना भाव मिळत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

किरकोळ विक्रेते प्रकाश ढमढेरे म्हणाले, ‘‘पितृ पंधरवड्यात या भाज्यांच्या मागणीत तीस ते चाळीस टक्के वाढ होत असते. यंदा मात्र चौथ भरणीच्या दिवशीही मागणी कमी आहे. इतर सणांच्या वेळी केले जाणारे जेवण लोक आवडीने खात असतात, परंतु पितृ पंधरवड्यात केले जाणारे नैवेद्याचे जेवण तेवढे आवडीने खाल्ले जात नाही. पूर्वी एकत्र कुटुंब होते, त्यामुळे स्वयंपाक हा जास्त केला जात होता. अलीकडे विभक्त कुटुंब पद्धतीमुळे ते प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे मर्यादित स्वरूपातच खरेदी केली जात आहे.’’ घाऊक व्यापारी विलास भुजबळ यांनीदेखील घाऊक बाजारातही या भाज्यांना कमी मागणी असल्याचे नमूद केले.

माझ्या सासू नेहमी भाजी आणतात. पण आज मी भाजी घेत आहे. नैवेद्यापुरते या भाज्या करणार आहोत.
- सारिका एडके, गृहिणी 

भाज्यांचे भाव 
 कारली : ५० ते ६० रुपये
 भेंडी : ५० ते ६० रुपये
 काकडी : ४० ते ६० रुपये
 मेथी: १२ ते १५ रुपये
 आळू : १० ते १५  रुपये  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com