नारायणगाव येथील उपबजारात भाजीपाला खरेदी-विक्री बाजार सुरू करणार : काळे

रवींद्र पाटे
Friday, 23 October 2020

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबजारात रविवारी (ता. २५) विजयादशमीच्या महूर्तावर भाजीपाला (तरकारी) खरेदी विक्री बाजार सुरू करण्याचा निर्णय

नारायणगाव : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबजारात रविवारी (ता. २५) विजयादशमीच्या महूर्तावर भाजीपाला (तरकारी) खरेदी विक्री बाजार सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे, अशी माहिती सभापती संजय काळे यांनी दिली.

मोठी बातमी : 'सीईटी' परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आणखी एक संधी!

भाजीपाला (तरकारी) खरेदी विक्री बाजाराचे उद्घाटन सकाळी साडेदहा वाजता आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते होणार आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, आशा बुचके आदी उपस्थित राहणार आहेत.

बाजार समितीच्या संचालक मंडळाची मिटींग सभापती काळे यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी काळे यांनी ही माहिती दिली.या वेळी उपसभापती दिलिप डुंबरे,जेष्ठ संचालक धोंडिभाऊ पिंगट,धनेश संचेती, निवृत्ती काळे,प्रकाश ताजणे,दीपक आवटे, संतोष तांबे,संतोष घोगरे,विपूल फ़ुलसुंदर,सुरेखा गांजाळे, हिराताई चव्हाण,सचिव रूपेश कवडे, शरद घोंगडे आदी उपस्थित होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सभापती काळे म्हणाले, ''सद्यस्थितीत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा ओतूर येथे भाजीपाला (तरकारी) खरेदी विक्री बाजार सुरू आहे. २००४ साली नारायणगाव येथे टोमॅटो उपबजार सुरू करण्यात आला होता. या उपबजाराला शेतकरी व व्यापारी यांचा पाठिंबा मिळाला. यामुळे  नारायणगाव येथे भाजीपाला खरेदी-विक्री बाजार सुरू करावा अशी शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षाची मागणी होती. मात्र जागे अभावी शक्य झाले नाही. बाजार समितीने टोमॅटो उपबजारासाठी नविन जागा खरेदी केल्याने आता जागेचा प्रश्न सुटला आहे.

प्रॉपर्टी कार्डला आता कायदाच ठरत आहे अडसर

शेतकऱ्यांना मिळणार हक्काची बाजारपेठ : सभापती काळे म्हणाले  नारायणगाव परिसर बारामाही बागायती आहे. येथिल भाजीपाला बाजारामुळे जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर या लगतच्या तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळणार आहे. येथील भाजीपाला महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यात विक्रीसाठी जाणार आहे.या मुळे टोमॅटो प्रमाणेच भाजीपाल्याला योग्य भाव मिळण्यास मदत होणार आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vegetable market to be started in narayangaon sub-market says sanjay Kale