चिंचवडेनगर येथे पदपथावरच भरते भाजी मंडई 

vegetable market  fills on footpath at Chinchwade Nagar
vegetable market fills on footpath at Chinchwade Nagar

पिंपरी : चिंचवडेनगर येथे सध्या पदपथावरच भाजी मंडई भरते आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्याने ये-जा करणे अवघड जात आहे. असे असले तरी मंडई नसल्याने भाजी विक्रेते व नागरिक यांची गैरसोय होत आहे. चिंचवड जुना जकातनाका ते वाल्हेकरवाडी या रस्त्यावर सध्या चिंचवडेनगर येथे रस्त्याच्या एका बाजूला भाजी मंडई भरते आहे. याच रस्त्यावर भाजी मंडईपासून काही अंतरावर चिंचवडकडे जाताना फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या लावलेल्या पाहण्यास मिळतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. 

सायंकाळी विशेषतः हा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो. येथील भाजी विक्रेत्यांची अन्यत्र पर्यायी व्यवस्था व्हायला हवी. तसेच, पदपथ नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोकळे करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

चिंचवडेनगर येथे भाजी मंडईसाठी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी नवनगर विकास प्राधिकरणाकडे पाठपुरावा करीत आहे. प्राधिकरणाकडून जागा मिळाल्यास मंडईची सोय करता येईल.

- नामदेव ढाके, नगरसेवक

शहर स्मार्ट सिटी होत असताना उड्डाणपूल, मेट्रो अशा सुविधांवर महापालिका भर देत आहे. मात्र, नागरिकांसाठी आवश्‍यक असलेल्या नागरी सुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नुसतेच शहर "हाय-फाय' करून काय फायदा? चिंचवडेनगरला भाजी मंडई होणे आवश्‍यक आहे.

- विठ्ठल पुरंदर, व्यावसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com