शेतकरी संपामुळे भाज्यांचे भाव दुप्पट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी 1 जूनपासून संप पुकारला आहे. त्याचा परिणाम शहरातील भाजीपाला आवकीवर होऊ लागला आहे. गुलटेकडी मार्केट यार्ड येथे शेतीमालाची बऱ्यापैकी आवक घटली. त्याचा दलालांनी घेतला. घाऊक खरेदीचे भाव वाढल्याने पिंपरी भाजी मंडईतील फळभाज्यांच्या किरकोळ विक्री भावातही वाढ झाल्याचे दिसून आले. 

पिंपरी : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे पिंपरी कॅम्प येथील भाजी मंडईत शेतीमालाची आवक कमी झाली. फळभाज्यांचे भाव रविवारी 10 ते 15 टक्‍क्‍यांनी वाढले. गाळ्यावरील माल संपल्याने दुपारनंतर जवळपास 10 ते 15 भाजी विक्रेत्यांना गाळे बंद ठेवावे लागले. चिंचवड भाजी मंडईतही भाजीपाल्याचे भाव दुप्पट झाले. 

केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी 1 जूनपासून संप पुकारला आहे. त्याचा परिणाम शहरातील भाजीपाला आवकीवर होऊ लागला आहे. गुलटेकडी मार्केट यार्ड येथे शेतीमालाची बऱ्यापैकी आवक घटली. त्याचा दलालांनी घेतला. घाऊक खरेदीचे भाव वाढल्याने पिंपरी भाजी मंडईतील फळभाज्यांच्या किरकोळ विक्री भावातही वाढ झाल्याचे दिसून आले. 
भाजी विक्रेते बाळासाहेब गायकवाड आणि बबन थिटे म्हणाले, ""गुलटेकडी मार्केट यार्डला शेतीमालाची कमी आवक झाली. त्यामुळे जागेवरच शेतीमालाचे भाव वाढले. किरकोळ विक्रीतही 10 ते 15 टक्‍क्‍यांची वाढ झाली. छोट्या व्यापाऱ्यांनी महाग भाजीपाला घेऊन त्याची विक्री करण्याऐवजी स्वतःचे गाळे बंद ठेवणे पसंत केले. तर 15 ते 20 गाळ्यांवरील माल संपल्याने गाळेधारकांना गाळे बंद ठेवावे लागले.'' 

पालेभाज्या विक्रेते शिवाजी कुदळे म्हणाले, ""पालेभाज्यांच्या आवकीवर शेतकरी संपाचा फारसा परिणाम झाला नाही. रविवारी नियमित आवक झाली. मात्र उन्हाने माल खराब झाल्याने आणि पावसाने थोडे नुकसान झाल्याने कोथिंबिरीची प्रतिगड्डी 10 ते 20 रुपयांपर्यंत विक्री झाली.'' 

चिंचवड भाजी मंडईतील अतुल पडवळ म्हणाले, ""गुलटेकडी येथेच भाज्यांची खरेदी महागल्याने किरकोळ विक्रेत्यांनी कमी प्रमाणात माल घेणे पसंत केले. रविवार सुटीचा दिवस असल्याने मंडईतील गाळे चालू राहिले. परंतु भाजीपाल्याची दुप्पट भावाने विक्री झाली.'' 
पिंपरी भाजी मंडईत दोन दिवसांपूर्वी हिरव्या मिरचीचे भाव 50 रुपये प्रतिकिलो होते. संपामुळे जागेवरच घाऊक खरेदी 60 रुपये झाली. तर किरकोळ विक्री 70 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोचली. सिमला मिरचीचे 40 रुपयांहून 60 रुपये प्रतिकिलो तर शेवगा 50 हून 60 रुपये तर वांग्याचे भाव 20 रुपयांहून 40 रुपये प्रतिकिलोने वाढले. याखेरीज, भेंडी 40 रुपयांहून 60 रुपये प्रतिकिलोने विकली गेली. 

Web Title: Vegetable prices doubled due to farmers' strike