वांग, मटार, गवार शंभर रूपये किलाे

vegitables1.jpg
vegitables1.jpg


पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर कोकणासह जिल्ह्याच्या विविध भागातून फळभाज्यांना मागणी वाढली आहे. बाजारात फळभाज्यांची आवक बेताची होत आहे. परंतु आवकेपेक्षा मागणी जास्त असल्याने किरकोळ बाजारात बहुतांश भाज्यांच्या दराने शंभरी पार केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. 
पावटा, मटार, घेवडा प्रतिकिलोचे दर 140 रुपयांपर्यंत गेले असून, वालवर, आले, दोडका यांचे दर शंभर रुपयांवर पोचले आहेत, तर इतर सर्व भाज्यांचे दर 80 ते 90 रुपये किलोपर्यंत गेले आहेत. ही परिस्थिती आणखी बिकट झाल्यास शहरात भाज्यांचा तुटवडा होण्याची शक्‍यता आहे. 
यंदा राज्यात पडलेला दुष्काळ त्यानंतर मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे फळभाज्यांच्या उत्पादनावर काहीसा परिणाम झाला आहे. फळभाज्यांचे उत्पादन बऱ्यापैकी चांगले असले तरी बाजारात फळभाज्यांची बेताची आवक होत आहे. कोल्हापूर, सांगली जिल्हा आणि सातारा जिल्ह्यातील काही भागात पुरस्थितीमुळे तेथून फळभाज्यांची आवक बंद झाली आहे. दुसरीकडे कोकणात दरवर्षी जास्तीचा पाऊस असतो. तेथे पावसाळ्यात भात पिकाशिवाय दुसरे पीक घेतले जात नाही. त्यामुळे कोकणातून पुण्याच्या मार्केयार्डातून फळभाज्यांची मागणी जास्त असते. तसेच पूरस्थिती निवाळलेल्या भागातून देखील भाज्यांना मागणी जास्त आहे. त्यामुळे घाऊक बाजारात काही फळभाज्यांचे भाव वाढले आहेत. पुढील काही दिवसांत ही परिस्थिती सुरळीत होईल, असा अंदाज अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी वर्तविला आहे.

' गेल्या काही दिवसात फळभाज्यांचे भाव दुप्पट वाढले आहेत. त्यामुळे महिन्याच्या खर्चात ही दुप्पट वाढ झाली आहे.' 
- स्मिता कुलकर्णी, गृहिणी

... म्हणून किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात वाढ 
याबाबत किरकोळ बाजारातील फळभाज्यांचे विक्रेते प्रकाश ढमढेरे म्हणाले, पावसामुळे फळभाज्यांचे नुकसान झाले असून चांगल्या भाज्यांना मागणी आहे. किरकोळ विक्रेत्यांना मार्केटयार्डात फळभाज्या खरेदी करताना फळभाज्यांचा भाव आणि त्यावर सेस, लेव्ही आणि आडतपोटी 8 टक्के अतिरिक्त रक्कम द्यावी लागते. त्यामुळे मार्केटयार्डातच भाज्यांच्या भावात अतिरिक्त 6 ते 8 रुपयांनी वाढ होते. किरकोळ बाजारात ग्राहक निवडून फळभाज्यांची खरेदी करतात. त्यामुळे भाज्यांच्या दरात आणखी वाढ होते. दरवाढीमुळे गिऱ्हाईक कमी असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. 

किरकोळ बाजारातील फळभाज्यांचे प्रतिकिलोचे भाव 
वांगी ( 90 ते 120), फ्लॉवर ( 90 ते 120), गवार  (100 ते 130),  मटार (100 ते 120),  घेवडा (150 ते 160), पावटा (100 ते 120),  वालवर (100 ते 120),  दोडका  (80 ते 100 ), चवळी (80 ते 100),  भेंडी  (80 ते 100) , हिरवी मिरची   (60 ते 80), कारली (100 ते 120), शेवगा ( 100 ते 120),  
घोसावळे (80 ते 100), तोंडली (80 ते 100), आले (160 ते 200),  कांदा  (35 ते 40). 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com