पितृ पंधरवड्यामुळे फळभाज्या महागल्या

Vegetable
Vegetable

मार्केट यार्ड - पितृपक्षामुळे नैवेद्यासाठी लागणाऱ्या गवार, भेंडी, तांबडा भोपळा, कारले, काकडी, मेथी तसेच अळूच्या पानांना मागणी वाढली आहे. एकीकडे जोरदार पाऊस तर दुसरीकडे फळभाज्या उत्पादित क्षेत्रात पावसाने ओढ दिली. त्यामुळे आवक घटल्यामुळे भाव २० टक्‍क्‍यांपर्यंत वाढले आहेत.

यंदा सोलापूर आणि नगर पट्ट्यात पाऊस नाही. तसेच पुणे, सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या काही भागांत मोठा पाऊस झाला. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. दरम्यान, मार्केट यार्डात दररोज ८० ते १०० ट्रक शेतमाल दाखल होत आहे. 

काकडी ४० रुपये किलो
काकडी ४० रुपये प्रतिकिलो, गवार, भेंडी, तांबडा भोपळा यांची ४० ते ६० रुपये, अळूचे पान १५ रुपये, मेथीची जुडीची २० रुपयांना विक्री होत आहे. कारली, गवार, चवळई, भेंडी, तांबडा भोपळा, देठ तसेच मेथीलाही मागणी आहे.

बाजारात दररोज भेंडीचे आठ ते दहा टेम्पो, तांबडा भोपळा दहा ते १२ टेम्पो येत आहेत. गेल्या आठवड्यांच्या तुलनेत फळभाज्यांचे भाव आवक घटल्यामुळे वाढले आहेत.
- विलास भुजबळ, अध्यक्ष, मार्केट यार्ड अडते असोसिएशन

पितृपक्ष पंधरवड्यात नैवेद्यासाठी विविध भाज्या एकत्र करून स्वतंत्र भाजी बनविण्यात येते. यामुळे बाजारात 
भाज्यांची मागणी वाढली आहे.
- अमोल घुले, उपाध्यक्ष, मार्केट यार्ड अडते असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com