भाज्या कडाडल्या

Vegetable-Rate
Vegetable-Rate

पिंपरी - परतीच्या पावसामुळे बळिराजा सुखावला असला, तरी काही पिकांना त्याचा फटकाही बसला आहे. पावसाच्या लहरीपणामुळे भाज्यांची आवक घटल्याने भाव कडाडले आहेत. कांद्याने सत्तरी गाठल्याने गृहिणींच्या डोळ्यात पाणी आले, तर लसणाला किलोमागे १६० रुपये मोजावे लागत आहेत.

कोथिंबीर जुडी ५० ते ६० रुपयांना असल्याने खरेदी करायची का, असा प्रश्‍न गृहिणींना पडला आहे. मागील आठवड्यात तुलनेत भाजीपाल्याचे भाव दहा टक्‍क्‍यांनी वाढल्याने ताटातील भाज्यांची पंगत गायब झाली असून त्याची जागा कडधान्याने घेतल्याची प्रतिक्रिया गृहिणींनी दिली.

पिंपरी कॅम्प मंडईत चाकण, चंदननगर आणि गुलटेकडीवरून भाज्यांची आवक होते; पण मुसळधार पावसाने मेथी, कोथिंबीर, पालक, चाकवत, कांदापात यांची पिके भुईसपाट झाल्याने आवक घटल्याची माहिती विक्रेते गणेश शिंदे यांनी दिली. भाज्यांचे भाव ऑक्‍टोबरच्या सुरवातीपासूनच चढे राहिले होते. मागील आठवड्यापासून ते स्थिर असून कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मटार, लसूण, शेवगा यांनी शंभरी ओंलाडल्याचे विक्रेते सचिन आहेर यांनी सांगितले. मेथी, पालकाची आवक कमी झाल्याने एका जुडीला ३० रुपये द्यावे लागत आहेत. गावरान कोथिंबीर ५० ते ६० रुपये, तर सटाणा (नाशिक) कोथिंबिरीला ४० रुपयाला जुडी आहे. बाजारात नागपुरी, जळगाव वांगे दाखल झाले असून ५० रुपये किलो आहेत. मोठे लिंबू २० रुपये डझन आहेत.

हिरवी मिरची कमी तिखट
आवक वाढल्याने सध्या बाजारात हिरवी मिरचीचे भाव कमी झाले असून, २० रुपये प्रतिकिलो आहे. मात्र, पावसाळा असल्याने ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरवली, तर दिल्ली गाजराची आवक लांबल्याने अनेकांना ७० रुपयांनी महाबळेश्‍वर गाजर खरेदी करावे लागत असल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com