‘ॲग्रोवन-सेवन मंत्रा’चा भाजीपाला व फळे येत्या सोमवारीही होणार वितरित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जुलै 2020

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात येत्या सोमवारपासून कडक लॉकडाउन पाळण्यात येणार आहे. लॉकडाउनच्या या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ‘ॲग्रोवन-सेवन मंत्रा’चा भाजीपाला व फळे येत्या सोमवारीही वितरित केला जाणार आहे. त्यासाठी आगाऊ नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे - कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात येत्या सोमवारपासून कडक लॉकडाउन पाळण्यात येणार आहे. लॉकडाउनच्या या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ‘ॲग्रोवन-सेवन मंत्रा’चा भाजीपाला व फळे येत्या सोमवारीही वितरित केला जाणार आहे. त्यासाठी आगाऊ नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सोमवारपासून अत्यंत कडक लॉकडाउन करण्यात येणार आहे. येत्या सोमवारी मध्यरात्रीनंतर या लॉकडाउनला सुरुवात होणार असून त्यानंतर नागरिकांना फक्त दूध आणि औषधे या अत्यावश्‍यक सेवाच मिळणार आहेत. या काळात भाजीपालाही मिळणार नाही. त्यामुळे नागरिकांनी आधीच भाजीपाला फळे खरेदी करावा, असे आवाहन विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.

No photo description available.

लॉकडाउनची ही परिस्थिती लक्षात घेऊन ‘ॲग्रोवन सेवन मंत्रा’ उपक्रमाअंतर्गत येत्या तीन दिवसांत जास्तीत जास्त लोकांपर्यंत भाजीपाला आणि फळे पोचवण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. त्यानुसार www.sevenmantras.com वर आपली व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्‌स बास्केट बुक करण्याची खास व्यवस्था करण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउनमध्ये ग्राहकांची कोणतीही अडचण होऊ नये यासाठी विशेष बाब म्हणून येत्या सोमवारीही भाजीपाला व फळांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्राहक रविवारी दुपारी एक वाजेपर्यंत बुकिंग करू शकतात. लॉकडाउनच्या काळात येत्या मंगळवारी आणि गुरुवारी मालाचे वितरण होणार नाही. ज्यांनी मंगळवारसाठी बुकिंग केले आहे, त्यांना त्यांचा भाजीपाला आणि फळे सोमवारीच घरपोच वितरीत केली जाणार आहेत.

‘सेवनमंत्रा’अंतर्गत दिला जाणारा भाजीपाला व फळे ही उत्तम दर्जाची, ताजी आणि टिकाऊ असल्याने ती लॉकडाऊनच्या काळात वापरता येऊ शकतात. छोट्या तसेच मोठ्या कुटुंबांना पुरेशा होतील अशा वेगवेगळ्या बास्केट्‌स यामध्ये उपलब्ध आहेत, त्यामुळे नागरिकांची गैरसोयही टळणारआहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vegetables and fruits of Agrowon Sevan Mantra will also be distributed on Monday