या रानभाज्यांची चव एकदा तरी नक्की चाखा...अनेक आजारांवर ठरतात गुणकारी

गोरख माझीरे
Wednesday, 22 July 2020

मुळशी तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या पावसाची हजेरी सुरू आहे. तसेच, गेल्या दीड महिन्यांपासून झालेल्या पावसामुळे तालुक्याच्या डोंगरदऱ्यांमध्ये विविध प्रकारच्या वनस्पती उगवल्या आहेत. त्यामध्ये रानभाज्याही आहेत.  औषधी गुणधर्मामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. 

कोळवण (पुणे) : मुळशी तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या पावसाची हजेरी सुरू आहे. तसेच, गेल्या दीड महिन्यांपासून झालेल्या पावसामुळे तालुक्याच्या डोंगरदऱ्यांमध्ये विविध प्रकारच्या वनस्पती उगवल्या आहेत. त्यामध्ये रानभाज्याही आहेत.  औषधी गुणधर्मामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. 

मुळशी तालुक्याच्या डोंगरी भागात पावासाळ्यात मोठ्या प्रमाणात रानभाज्या मिळतात. या रानभाज्यांमध्ये प्रोटिन, लोह, खनिज, जस्त (झिंक), तांबे, कॅल्शियम यांचा भरपूर साठा असतो. या भाज्या अनेक आजारांवर औषधांचेही काम करतात. त्यामुळे आदिवासी आणि शेतकरी कुटुंबांच्या जेवनामध्ये पावसाळ्याच्या दिवसांत या भाज्या हमखास असतात. या भाज्यांमधील औषधी गुणधर्मामुळे शहरी भागातूनही मोठ्या प्रमाणात मागणी असते. 

Image may contain: plant, nature and outdoor

कोणाच्याही संपर्कात नाही तरीही कोरोना पाॅझिटिव्ह

मुळशी तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या पावसाची हजेरी सुरू आहे. तसेच, गेल्या दीड महिन्यांपासून झालेल्या पावसामुळे तालुक्याच्या डोंगरदऱ्यांमध्ये विविध प्रकारच्या वनस्पती उगवल्या आहेत. त्यामध्ये विविध प्रकारचे गवत, फुलांची झाडे आहेत. त्याचप्रमाणे वेलवर्गीय, गवतवर्गीय आणि फळवर्गीय रानभाज्याही आहेत. चिचार्डी, कर्टुले, चायत, मोहर, भारंगी, पाथरी, अंबाडी, वाघाटी, टाकळा या भाज्या सध्या मुळशी तालुक्याच्या डोंगरांवर मिळत आहेत. त्यातील काही भाज्या आता तयार झाल्या आहेत, तर काही भाज्या लवकरच खाण्यायोग्य होतील. 

पोलिस काढणार रेखचित्रातून आरोपींचा माग, पाच दिवसांचा कोर्स

या रानभाज्यांमधील अनेक भाज्यांची चव कडू असते, पण मधुमेहाच्या रुग्णांसाठी त्या मोठ्या प्रमाणात औषधी ठरतात.  त्याचप्रमाणे काही वेलवर्गीय भाज्यांमध्ये सुक्या मासळी घालूनही चव आणली जाते. त्यामुळे या भाज्यांना मोठी मागणी असते. कारण, पावसाळ्याच्या दिवसात दोन ते चारच महिने त्या उपलब्ध होत असतात. आदिवासी कातकरी समाजातील नागरिक तर संपूर्ण पावसाळ्यात याच भाज्या खात असतात. त्यांचे ते पारंपारिक अन्न आहे.

No photo description available.

सायकलवेड्या कुटुंबाचा आनंददायी जीवनप्रवास

या रानभाज्यांची नाळ सणांशीही जोडलेली आहेत. आदिवसी समाजातील नागरिक आपल्या दैवतांना नैवद्य म्हणूनही या भाज्या करतात. तसेच, गौरी सणाच्या काळात या भाज्यांचा उपयोग महिला उपवासासाठी व देवीला नैवद्य म्हणून करतात. यातील अनेक भाज्या या खोकला, पोटदुखी या विकारांवरही प्रभावी ठरतात. त्यामुळे सणावारांशी त्यांची जोडणी झाली आहे. आदिवसी समाजातील नागरिक या काळात उगवणाऱ्या कंदांच्याही भाज्या करतात. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लाॅकडाउन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात त्यामुळे भाज्यांचा तुटवडा जाणवत आहे. परंतु, मुळशी तालुक्यातील डोंगरी भागात पावसाळ्यात आपोआप उगवून येणाऱ्या रानभाज्यांनी शेतकऱ्यांना तारले आहे. कुठलेच खत नाही, निगा नाही, आवर्जुन लागवड नाही, तरीही प्रत्येक भाजीची विशेष चव लागते. 100 टक्के संद्रिय पद्धतीने तयार झालेल्या या भाज्यांमध्ये औषधी गुणधर्म व निसर्गत: विशेष गुण असतो. त्यामुळे शेतकरी भाज्यांसाठी रानभाज्यांचा आधार घेत आहेत. या भाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्मांची जान असलेले त्यांच्याकडे पाठ फिरवत नाहीत. त्यामुळे त्यांचा आस्वाद पावसाळ्याच्या दिवसांत जेवणासोबत घ्यायला हवा.

मुळशी तालुक्यातील आदिवासी आणि शेतकरी पावसाळ्याच्या दिवसांत या रानभाज्या शोधून काढतात आणि शहरी भागात विक्रीसाठी घेऊन जातात. त्यातून त्यांना हक्काचे दोन पैसे मिळतात. परंतु, या वर्षीच्या लाॅकडानचा फटका त्यांना बसला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vegetables grown in the forest of Mulshi taluka