गोमांस वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या चालकाने जुन्नरच्या पोलिस निरीक्षकावर घातली गाडी

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

जुन्नर - गस्ती दरम्यान रस्त्यावर उभे असलेले जुन्नरचे पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे व कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याची घटना आज गुरुवारी ता.29 रोजी पहाटे पणसुंबापेठ जुन्नर येथे घडली. यावेळी वाहनचालकाने पोलीस वाहनाला धडक देत पळून जाण्याचा प्रयन्त केला असता पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्या गाडीची तपासणी केली असता त्यात सहाशे किलो गोमांस मिळून आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली. 

येथील एका धार्मिकस्थळाजवळ एक चारचाकी वाहन (एम एच १२ के एन १५८७) संशयास्पदरीत्या फिरत असताना त्यास थांबण्याचा इशारा केला असता चालक शाहिद सलीम इनामदार (रा. मंगळवार पेठ, जुन्नर) याने गाडी वेगाने घेऊन रस्त्यात उभे असलेले पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला, तसेच रस्त्यात उभी केलेल्या पोलीस गाडीला जोराने धडक दिली त्यानंतर तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला पकडण्यात आले. 

त्याच्याकडे चौकशी केली असता नोमान कुरेशी, मजहर कुरेशी, अतिक बेपारी, नाजिम बेपारी, जीकरान कुरेशी, बाबा कुरेशी (सर्व रा. खलीलपुरा, जुन्नर) यांनी बेकायदेशीरपणे जनावरांची कत्तल करून ते गोमांस माझेकडे दिले असल्याचे सांगितले. 

याबाबतची फिर्याद पोलीस निरीक्षक नलावडे यांनी दिलेली असून पोलिसांनी गोवंशहत्या, भारतीय प्राणी संरक्षण कायदा कलमांनुसार गुन्हा दाखल केलेला असून आरोपी शाहिद इनामदार यास अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक मिलिंद साबळे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: vehicle of the beef transporter Junnar's police inspector