‘फास्टॅग’ होणार गतिमान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

‘फास्टॅग’ कसे काम करते?

  • वाहनांच्या समोरील काचेवर बसविलेली इलेक्‍ट्रॉनिक चीप
  • टोल नाक्‍यावर वाहन आल्यास ‘फास्टॅग’ चीप स्कॅन होऊन त्यातील टोलचे पैसे वजा होतात
  • ‘फास्टॅग’ असलेल्या वाहनांना लेनमध्ये थांबावे लागत नाही
  • ‘फास्टॅग’ सर्व टोल नाक्‍यांवर उपलब्ध
  • 'फास्टॅग’ ऑनलाइन रिचार्ज करण्याची सुविधा

खेड-शिवापूर - टोल नाक्‍यांवर प्रवाशांचा वेळ वाया जाऊ नये; यासाठी ‘फास्टॅग’ यंत्रणा अधिक गतिमान करण्यात येणार आहे. १ डिसेंबरपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोल नाक्‍यांवरील सर्व मार्गिकांमधून इलेक्‍ट्रॉनिक टोल कलेक्‍शन (ईटीसी) पद्धतीने टोल वसुली करण्यात येणार आहे. नागरिकांनी वाहनांना ‘फास्टॅग’ बसवून घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे.

टोल नाक्‍यांवर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यात प्रवाशांचा जास्त वेळ वाया जातो. या पार्श्वभूमीवर काही वर्षांपूर्वी टोल नाक्‍यांवर ‘फास्टॅग’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. त्यासाठी नाक्‍यावर मोजक्‍या ‘ईटीसी’ मार्गिका ठेवल्या होत्या. मात्र ‘फास्टॅग’ वापरणाऱ्या वाहनांचे प्रमाण कमी होते. तसेच ईटीसी लेन शोधताना चालकांचा गोंधळ उडत होता. या पार्श्वभूमीवर प्राधिकरणाने टोल नाक्‍यांवरील सर्व मार्गिका ईटीसी  करण्याचा निर्णय घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vehicle fastag system on toll naka