अरे वा, वाहनांच्या फिटनेस टेस्ट दिवे येथे पुन्हा सुरू होणार  

rto
rto

गराडे (पुणे) : पुरंदर तालुक्यातील दिवे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) पासिंग ट्रॅकवर वाहनांच्या फिटनेस टेस्ट येत्या सोमवारपासून (ता. २९) सुरू होत असल्याची माहिती परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवे येथील स्थानिक गावकऱ्यांनी आरटीओच्या कामकाजाला विरोध केला होता. पण, याबाबत गावकऱ्यांनी माघार घेतली असून, तसे पत्र ग्रामपंचायतीने दिले. त्यामुळे सोमवारपासून येथील काम सुरु होत आहे. ज्यांना अपॉइंटमेंट देण्यात आल्या होत्या, त्यांनी ठरल्याप्रमाणे सोमवारी दिवे येथे उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, या परिस्थितीत दिवे येथे कामकाज सुरू करू नये, अशा मागणीचे निवेदन स्थानिक ग्रामस्थांनामार्फत आरटीओ प्रशासनाला देण्यात आली होते. या पार्श्वभूमीवर आरटीओने कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण, आता दिवे येथील पासिंग ट्रॅकवर वाहनांच्या फिटनेस टेस्ट सोमवारपासून सुरू होत आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com