कारवाईत वाहनांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

पुणे - रस्त्यावर उभी केलेली वाहने पोलिसांनी उचलून अन्यत्र हलवली. मात्र वाहने उचलताना योग्य खबरदारी न घेतल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्याचबरोबर दंडाची रक्कमही जास्त ठेवल्याने वाहनचालकांनी संताप व्यक्त केला. 

पुणे - रस्त्यावर उभी केलेली वाहने पोलिसांनी उचलून अन्यत्र हलवली. मात्र वाहने उचलताना योग्य खबरदारी न घेतल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्याचबरोबर दंडाची रक्कमही जास्त ठेवल्याने वाहनचालकांनी संताप व्यक्त केला. 

शहराच्या मध्यवर्ती भागासह इतर काही भागांत काही दिवसांपासून रस्त्यांवर उभ्या केलेल्या वाहनांचा शोध घेऊन पोलिसांनी कारवाई करण्यास सुरवात केली आहे. मात्र वाहने नेमकी कोणी उचलली, कोठे नेली, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम होता. पोलिस ठाण्यांमध्ये संपर्क साधल्यानंतर वाहने नदीपात्रामध्ये हलविण्यात आल्याचे त्यांना समजले. त्यानंतर सोमवारी सकाळी वाहनचालकांनी नदीपात्रात जाऊन वाहनांची पाहणी केली असता, बहुतांश वाहनांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर नागरिकांनी वाहतूक पोलिसांकडे धाव घेतली. वाहतूक पोलिसांनी त्यांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे पाठविले. 

आसिफ शेख (तोफखाना, शिवाजीनगर) - पोलिसांनी खबरदारी न घेतल्याने कारचे नुकसान झाले. 

गिरीश सोमाणी (सदाशिव पेठ) - पोलिसांनी रविवारी रात्री आमची गाडी उचलून नेली. दुचाकीसाठी पाच हजार रुपये दंड सांगितला आहे. आमच्या वाहनांचे नुकसान झाले आहे .

मिलिंद डहाळे (टिळक रस्ता) - टिळक रस्त्यावर कार लावली असताना पोलिसांनी ती उचलून नदीपात्रात आणली. १५ हजार रुपये दंड आकारला आहे.

वाहनांच्या नुकसानीची जबाबदारी वाहनचालकांचीच असेल. वाहनांवर कारवाई होऊ नये, असे वाटत असेल, तर वाहनचालकांनी रस्त्यांऐवजी सुरक्षितस्थळी वाहने लावावीत. 
- तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

Web Title: Vehicle Loss in Crime