वाहनचोरांचा पोलिसांना लागेना ठावठिकाणा..

Police
Police

पिंपरी - शहरातील पंधरा पोलिस ठाण्यांमध्ये वाहनचोरीचे दरदिवशी किमान दोन ते तीन गुन्हे दाखल होतात. तथापि, या गुन्ह्यांच्या तपासाचे प्रमाण अत्यल्पच आहे. वाहन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून चोरीची वाहने जप्त करण्यात पोलिसांना यश येतेही. पण, या चोरट्यांच्या म्होरक्‍यांचा सुगावा लागत नसल्याचे चित्र आहे. 

शहरात वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दररोज दोन ते तीन दुचाकी चोरीचे गुन्हे पोलिसांत दाखल होत आहेत. ऐन वर्दळीच्या ठिकाणी उभी असलेली वाहने चोरटे अगदी सहज पळवून नेतात. त्याबाबत जवळच्या ठाण्यात चोरीची तक्रार नोंदविली जाते. या चोरीचा तपास केवळ चोरट्यापर्यंत पोचून त्यांच्याकडून चोरीचे वाहन जप्त करेपर्यंत मर्यादित राहातो. 

६०४ गुन्हे तपासाविनाच
१ जानेवारी ते ३१ जुलै या कालावधीत आयुक्तालयामध्ये वाहनचोरीचे ६७५ गुन्हे दाखल झाले. त्यात दुचाकी चोरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातील ७१ गुन्ह्यांचा तपास लागला. तर, ६०४ गुन्ह्यांचा कोणताही तपास लागला नाही. हे तपास लागण्याचे अत्यल्प प्रमाण लक्षात घेऊन आयुक्तालयाकडून ऑगस्ट महिन्यात तपास पथक स्थापन केले. या पथकाने मागील दीड महिन्यातील वाहनचोरीचे काही गुन्हे उघडकीस आणलेही. चोरट्यांच्या टोळ्या जेरबंद करीत वाहनेही जप्त केली. मात्र, त्यानंतरही वाहनचोरीच्या घटना कायम राहिल्या. 

सुट्या भागांची होते विक्री
वाहनांचा नोंदणी क्रमांकात बदल करणे, त्याचे सुटे भाग करून विक्री करणे तसेच अन्य ठिकाणी ही वाहने कमी किमतीत विकण्याचे प्रमाण मोठे आहे. दरम्यान, एखाद्या वाहनाला अपघात झाल्यास अथवा खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतरच संबंधित वाहनाची सविस्तर माहिती पोलिस घेतात. या माध्यमातून अनेकदा चोरलेली अथवा गुन्ह्यात वापरलेली वाहने सापडतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com