पिंपरीत वाहनांची जाळपोळ

संदीप घिसे 
मंगळवार, 31 जुलै 2018

या आगीत तानाजी पवार, मधुकर तुरूकमारे, राहूल तांबे आणि बाबा शेख यांच्या दुचाकीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. वाहने जाळपोळीच्या घटनेमुळे रहिवाश्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पिंपरी (पुणे) : पिंपरीतील भाटनगर परिसरातील पत्राशेड येथे चार वाहनांची जाळपोळ करण्यात आली. ही घटना मंगळवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडली.

लिडिंग फायरमन अशोक कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्राशेड, भाटनगर परिसरात आग लागल्याची वर्दी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास अग्निशामक दलास मिळाली. त्यानुसार संत तुकाराम नगर अग्निशामक मुख्यालयातून एक बंब घटना स्थळी दाखल झाला. अवघ्या दहा मिनिटांत आग आटोक्यात आणली. यासाठी अग्निशामक दलाचे जवान लिडिंग फायरमन अशोक कानडे. शंकर पाटील. भूषण येवले मयुर कुंभार वाहन चालक प्रविण लांडगे यांनी शर्थीचे प्रयत्न केले.

या आगीत तानाजी पवार, मधुकर तुरूकमारे, राहूल तांबे आणि बाबा शेख यांच्या दुचाकीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. वाहने जाळपोळीच्या घटनेमुळे रहिवाश्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: vehicle torched in Pimpri