वाहन प्रशिक्षणात वशिलेबाजी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

पिंपरी - महिला सक्षमीकरणासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण सुरू केले आहे. परंतु, लाभधारक ठरवताना पदाधिकाऱ्यांच्या वॉर्डामध्येच झुकते माप दिले आहे, अशी तक्रार काही लोकप्रतिनिधींनी केली.

पिंपरी - महिला सक्षमीकरणासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण सुरू केले आहे. परंतु, लाभधारक ठरवताना पदाधिकाऱ्यांच्या वॉर्डामध्येच झुकते माप दिले आहे, अशी तक्रार काही लोकप्रतिनिधींनी केली.

यापूर्वी २००४ - २००५ मध्ये प्रशिक्षणाची एकच बॅच झाली. प्रशिक्षणानंतर वाहन परवान्याचे पैसे नेमके कोणी भरायचे? यावरून या योजनेला घरघर लागली. त्यानंतर १३ वर्षांनंतर महिला व बाल कल्याण समितीचे चारचाकी हलके वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी ३२ वॉर्डातील लोकप्रतिनिधींनी प्रभागातील गरजू महिला व मुलींकडून अर्ज भरून घेतले आहेत. परंतु, प्रत्यक्षात केवळ ७ हजार ८५६ अर्ज प्राप्त झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यापैकी फक्त १ हजार ७४४ महिला पात्र  ठरल्या असून त्यांना पहिला टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी फक्त दीड हजार महिला लाभार्थी पात्र ठरल्या. यावर अनेक महिला नगरसेविकांनी भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार लाभार्थी यादी पाहिल्यावर ठराविक वॉर्डातील महिलांचेच नाव यादीत असल्याचे आढळले. सांगवी, पिंपळे गुरव, चऱ्होली, मोशी अशा ठिकाणीच प्रशिक्षण देण्यात येत आहेत. 

चिंचवडमधील नगरसेविकेने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ‘‘माझ्या प्रभागातील सुमारे ४ चार महिलांचे अर्ज भरले होते. पण, एकीचेही नाव यादीत न आढळल्याने आश्‍चर्य वाटते.’’

संभाजीनगर - मोरवाडी नगरसेविका म्हणाली की, ‘‘महापालिकेत काम करणे अवघड झाले आहे. माझ्या वॉर्डातील एका महिलेचेदेखील नाव यादीत नाही. त्यामुळे प्रशिक्षणाला सुरवात झाली नाही.’’

नगरसेवक सचिन चिखले म्हणाले, ‘‘माझ्या वॉर्डातील महिलांवरदेखील अन्याय झाला आहे. हजारो अर्ज भरूनही एकाही महिलेचे नाव यादीत न येणे यावरून पक्षपातीपणा दिसून येतो. ठराविक प्रभागातील महिलांसाठीच ही योजना असल्याचे दिसते.’’ 

प्राप्त अर्जांची चाचपणी करून पात्र- अपात्र लाभार्थ्यांची निवड केली आहे. अपात्र अर्ज पुन्हा दुरुस्ती करून पाठवण्यात येतील. सगळ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.’’
- सुनीता तापकीर, सभापती, महिला व बाल कल्याण विभाग  

Web Title: vehicle training setting