Video : तुकाईनगर परिसरात वाहनांची तोडफोड 

tukainagar.jpg
tukainagar.jpg

सिंहगड रस्ता : सिंहगड रस्ता परिसरातील तुकाईनगर, महादेवनगर परिसरात अचानक आलेल्या अज्ञात टोळक्‍याने परिसरातील गाड्या फोडून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.

हिंगणे भागातून तुकाईनगर, महादेवनगर, समर्थनगर परिसरात वीस ते पंचवीस तरुण आले. त्यांच्या हातात हत्यारे होती. येताना रस्त्यात दिसेल त्या गाड्या त्यांनी फोडल्या. पोलिस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, पोलिस उपायुक्त बच्चनसिंग, सहायक पोलिस आयुक्त के. राठोड, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) शिवाजी पवार, सिंहगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दुर्योधन पवार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) दादासाहेब गायकवाड आदींनी घटनास्थळी भेट दिली. 
या घटनेमुळे परिसरात छावणीचे रूप आले आहे. 

दरम्यान, अज्ञात टोळक्‍यांनी परिसरातील दुचाकी, चारचाकी यांचे केवळ नुकसान केले नाही, तर नागरिकांच्या घरात घुसूनदेखील नुकसान केले. तसेच गाडी का फोडता म्हणून गाडी मालक विचारावयास गेले असता, त्यांच्या हातावर कोयत्याने वार करून, त्यांना जखमी केले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. या परिसरात दोन टोळ्यांचे युद्ध झाले. तसेच पूर्वीच्या भांडणातून हा प्रसंग ओढावल्याची नागरिकांत चर्चा होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com