पुणे : किरकोळ कारणावरुन झाले भांडण अन् केली गाड्यांची तोडफोड

पुणे : किरकोळ कारणावरुन झाले भांडण अन् केली गाड्यांची तोडफोड

पुणे : किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणाच्या रागातून टोळक्‍याने एका नागरिकाच्या कारसह चार वाहनांची तोडफोड करुन नुकसान केले. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी चौघांना अटक केली. ही घटना शुक्रवारी पहाटे दोन वाजता धायरी येथील बालाजी पॅराडाईजजवळ घडली. 

साहील बशीर शेख (वय 19), सैफल अजुमल हुसैन (वय 19), सिद्धार्थ सोनबा पोकळे (वय 20), ओम गोरख पाटील (वय 19, सर्व रा. धायरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी भैरवनाथ पाटील (वय 39, रा. जिजाईनगर, धायरी) यांनी फिर्याद सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धायरी येथे काही दिवसांपूर्वी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी फिर्यादी यांच्या कारची अनोळखी व्यक्तीच्या गाडीला किरकोळ अपघात झाला होता. त्याच्या रागातून आरोपींनी शुक्रवारी पहाटे फिर्यादी दोन वाजण्याच्या सुमारास यांच्या घरासमोर येऊन आरडाओरडा केला. 

फिर्यादी हे बाहेर आले, त्यावेळी सात ते आठ जणांच्या टोळक्‍याने फिर्यादी यांच्या स्वीफ्ट कारसह अन्य व्यक्तींच्या हुंडाई असेन्ट कार, मारुती सुझुकी स्कूल व्हॅन व स्कॉर्पिओ अशा गाड्यांची लाकडी दांडके व कोयत्याने तोडफोड करून नुकसान केले. त्यानंतर आरोपी पळून गेले. याप्रकरणी फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपींना तत्काळ अटक केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com