पिंपरीत वाहनांची तोडफोड करुन टोळक्यांनी माजवली दहशत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

रात्री साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने आरडाओरडा करीत लाकडी दांडक्याने अचानक वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. या वाहनांध्ये रिक्षा, दुचाकी व मोटारीचा समावेश आहे.

पिंपरी : दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने सात ते आठ वाहनांची तोडफोड करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. ही घटना पिंपरीतील संजय गांधीनगर परिसरात सोमवारी(ता.13) घडली.

Image may contain: car and outdoor 
रात्री साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने आरडाओरडा करीत लाकडी दांडक्याने अचानक वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. या वाहनांध्ये रिक्षा, दुचाकी व मोटारीचा समावेश आहे.

No photo description available.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत टोळके पसार झाले होते. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
No photo description available.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vehicles vandalized by goons Sanjay Gandhi Nagar Pimpri