Sun, October 1, 2023

Pune Crime : सिंहगड रस्त्यावरील सोसायटीत वाहने पेटवली
Published on : 9 June 2023, 5:05 pm
पुणे : सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द भागातील एका सोसायटीमध्ये वाहने पेटवून दिल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. याबाबत महेंद्र प्रदीप भिरुड (वय ४०, रा. सिंहगड रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वडगाव खुर्द भागातील लगडमळा येथील मियामी सोसायटीत अज्ञात व्यक्तीने पार्किंगमधील दुचाकी आणि मोटारीवर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून दिली. या घटनेत वाहनांचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत रहिवाशांनी पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. पोलिसांनी सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे.