पुण्यातील या नदीवरील बंधारे भरण्यास सुरवात, पण....

भावडी (ता. आंबेगाव) - येथील वेळ नदीवरील बंधारा सततच्या पावसाने पुर्णपणे भरून ओसंडून वाहू लागला आहे.
भावडी (ता. आंबेगाव) - येथील वेळ नदीवरील बंधारा सततच्या पावसाने पुर्णपणे भरून ओसंडून वाहू लागला आहे.

सातगाव पठार - सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात सतत पडत असलेल्या पावसामुळे वेळ नदीवरील बंधारे भरण्यास सुरवात झाली असून परीसरातील ओढे, नाले खळखळण्यास सुरवात झाली आहे. मात्र तरीही अजून दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतिक्षाच आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सातगावातील पारगाव, कुरवंडी, पेठ, भावडी, कुदळेवाडी, कोल्हारवाडी, थुगाव आदी गावांत पावसाने चांगलीच बरसात केली आहे. संततधार बरसणार्‍या पावसाने परिसरातील ओढे-नाले खळाळू लागले आहेत.

परिसरातील विहीरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यास थोड्याफार प्रमाणात सुरवात झाली आहे. नदीला अजूनही पूर गेलेला नाही. त्यामुळे शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. 

वेळेश्वर डोंगरावर उगम पावणार्‍या वेळ नदी पात्रातील बंधारे भरण्यास सुरवात झाली असून भावडी ता. आंबेगाव येथील बंधारा पुर्णपणे भरून ओसंडून वाहू लागला आहे. या सतत पडणार्‍या पावसाने परिसरातील डोंगररांगा हिरव्यागार झाल्या असून त्यामुळे चार्‍याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. या भागातील ओढे - नाले जरी खळाळू लागले असले तरी वेळ नदीला अजूनतरी पूर गेलेला नाही. त्यामुळे अजून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पावसाची प्रतिक्षा आहे. येथील मख्य पिक असलेले बटाटा पिक मात्र या सततच्या पावसाने चांगलेच जोमदार आले आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com