खासदारांनो, बारामतीला भेट द्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

बारामती शहर - 'ग्रामीण विकासाच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनाला आकार देण्याचे काम बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. दिल्लीत गेल्यानंतर सर्व खासदारांनी एकदा तरी बारामतीला भेट देऊन येथे सुरू असलेले ग्रामीण विकासाचे काम पाहावे, असे आपण सांगणार आहोत,’’ असे गौरवोद्‌गार उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी काढले.

नायडू यांनी आपल्या बारामती भेटीनंतर विद्या प्रतिष्ठान येथे पत्रकारांशी संवाद साधला. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, पालकमंत्री गिरीश बापट, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या वेळी उपस्थित होते. 

नायडू म्हणाले, ‘‘बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र हे देशातील इतर कृषी विज्ञान केंद्रासाठी रोल मॉडेल आहे. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सुरू असलेले काम उल्लेखनीय असून, देशातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांनी याचा आदर्श घ्यायला हवा. प्रयोगशाळेतून शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत संशोधन पोचवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचे काम पाहून आपण प्रभावित झालो आहोत. कृषी व शिक्षणाच्या बाबतीत बारामतीचा झालेला विकास पाहून मनास समाधान वाटले.’’ 

तसेच, स्व. अप्पासाहेब पवार व राजेंद्र पवार यांच्या कामगिरीचेही नायडू यांनी कौतुक केले. 

जग वेगाने बदलते आहे, त्यामुळे कृषी क्षेत्रातही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे होणे गरजेचे आहे. बारामतीत संशोधनासोबतच सुरू असलेले पूरक कामही उपयुक्त असून, त्याचा फायदा सर्वांना होतो आहे, हे समाधानाचे आहे. मला स्वतःला शेतीची पार्श्वभूमी असून, बारामती पाहून मी प्रभावित व समाधानी आहे.
 - वेंकय्या नायडू, उपराष्ट्रपती

‘कृषीक्षेत्रातील संशोधन पुरेसे नाही’
कृषी क्षेत्रात देशाने संशोधन मोठ्या प्रमाणावर केले असले, तरी 
जगाचा वेग पाहता ते पुरेसे नाही. ग्रामीण भागातील लोकांनाही विकासाची फळे चाखता यावीत, असे त्यांना नेहमी वाटत असते. नैसर्गिक संकट, मॉन्सूनचा लहरीपणा व बाजारपेठेचे संकट आणि वाढत्या स्पर्धेमुळे अशा कृषी विज्ञान केंद्रांची अधिक गरज आहे, असे उपराष्ट्रपती नायडू म्हणाले. 

Web Title: venkaiah naidu baramati development