वरसोलीतील बायोगॅस प्रकल्प अंतिम टप्प्यात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

लोणावळा : लोणावळा नगर परिषदेच्या वतीने कचऱ्यातून वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. वरसोली कचराडेपो येथील सहा टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प अंतिम टप्प्यात असून, येत्या महिनाभरात या प्रकल्पाचे उद्‌घाटन होणार आहे. प्रकल्पातून तीनशे मीटर क्‍यूब गॅसनिर्मिती करण्यात येणार असून, त्यातून सुमारे एक हजार वॉट विजेची निर्मिती करण्यात येणार आहे. प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेतून कचरा डेपोचा परिसर उजळणार आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 2.35 कोटी, 14 वा वित्त आयोग, प्रदूषण, प्रवासी करातून 7.86 कोटी रुपये खर्चून प्रकल्प उभा राहणार आहे. 

शहरात वाढत्या कचऱ्याची समस्या, आरोग्याचा प्रश्‍न व कचरा डेपोस नागरिकांचा होणारा संभाव्य विरोध या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारच्या घनकचरा व्यवस्थापन व नगरोत्थान योजनेअंतर्गत वरसोली कचरा डेपोवर अत्याधुनिक पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने कचऱ्यावर आधारित बायोगॅस प्रकल्प, सायंटिफिक पार्क साकारण्यात येत आहे. नगरपरिषदेने कचरा डेपोसाठी वरसोलीतील तीन हेक्‍टर 61 आर. जागा सुमारे आठ कोटी 76 लाख रुपये खर्चून संपादित केली आहे. 

लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, नगरसेवक देविदास कडू, निखिल कवीश्वर आदींनी या प्रकल्पाची पाहणी केली. लोणावळ्यात दरदिवशी सोळा टन कचरा निर्माण होतो, त्यापैकी बारा टन कचरा केवळ हॉटेल्समधून निर्माण होते. मुख्याधिकारी सचिन पवार म्हणाले, ""कचरा डेपोवर "बायो मायनिंग'चे काम सुरू झाले आहे.'' वाकसईचे उपसरपंच मनोज जगताप म्हणाले, ""कचरा डेपोवर सध्या "बायो मायनिंग"चे काम सुरू असून, अत्यंत शास्त्रीय पद्धतीने कचऱ्याचे विलगीकरण सुरू आहे. कचरा जागेवरच जिरविण्यात येत आहे.'' 

""कचरा डेपोमुळे दुर्गंधी, आरोग्याच्या प्रश्‍नांमुळे वरसोली, वाकसईचे नागरिक त्रस्त होते. अनेकदा आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला. कचऱ्यावर प्रकिया करण्यात येत असल्याने दुर्गंधी कमी होत आहे, याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात येत आहे. वरसोली कचरा डेपो प्रकल्प पथदर्शी ठरणार आहे.'' 
- सुरेखा जाधव, नगराध्यक्षा, लोणावळा 

Web Title: the versailles biogas project is enter in the last phase