नाट्यवादळ अनंतात विलीन; श्रीराम लागूंवर शासकीय इतमामांत अंत्यसंस्कार 

टीम ई-सकाळ
Friday, 20 December 2019

पुणे : आपल्या कसदार अभिनयाने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी गाजवणार ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्यावर आज, शासकीय इतमामांत अंत्यसंस्कार करण्यात आले. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार झाले. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी सिनेमा, साहित्य, नाट्य क्षेत्रातील मंडळींनी गर्दी केली होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे : आपल्या कसदार अभिनयाने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी गाजवणार ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्यावर आज, शासकीय इतमामांत अंत्यसंस्कार करण्यात आले. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार झाले. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी सिनेमा, साहित्य, नाट्य क्षेत्रातील मंडळींनी गर्दी केली होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image may contain: 5 people, people standing

Image may contain: 11 people, including Sambhaji Patil and Sanjay Kadu, people standing and outdoor

अन् तिसरी घंटा झाली!
डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी (17 डिसेंबर) रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिक खासगी रुग्णालयात शवागृहात ठेवण्यात आले होते. आज, सकाळी त्यांचे पार्थिक शवागृहातून कर्वेनगरातील त्यांच्या घरी नेण्यात आले. त्यानंतर बालगंधर्व रंगमंदिर येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीष बापटही उपस्थित होते. तेथे विविध क्षेत्रातील व्यक्तींनी तसेच नाट्यप्रेमी आणि सर्वसामान्यांनी डॉ. श्रीराम लागू यांचे दर्शन घेतले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, नाना पाटेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, अभिनेते नंदू माधव आदींनी तसेच डाव्या-पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी, अंनिसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. बालगंधर्व येथेच पोलिसांनी डॉ. श्रीराम लागू यांना सलामी दिली. त्यानंतर तिसरी घंटा देऊन, बालगंधर्वन ते वैकुंठ स्मशानभूमी अशी अंत्यात्रा काढण्यात आली. वैकुंठस्मशानभूमीत पुन्हा डॉ. लागू यांना मानवंदना देण्यात आली. 

Image may contain: 4 people, people standing, flower and wedding

Image may contain: 6 people, people standing, crowd and outdoor

'सूर्य पाहिलेला माणूस’
डॉ. लागू यांनी शंभरहून अधिक हिंदी आणि मराठी चित्रपट, तसेच ४० हून अधिक मराठी, हिंदी आणि गुजराती नाटकांमध्ये अभिनय केला होता. त्यांनी नाटकांचे दिग्दर्शनही केले होते. ‘नटसम्राट’नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर या भूमिकेमुळं ते नाटक अजरामर ठरले. १९७८ मध्ये ‘घरोंदा’ या हिंदी चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सहायक अभिनेत्याचा ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला होता. वृद्धापकाळामुळं गेल्या काही दिवसांपासून डॉ. लागू यांची प्रकृती बरी नव्हती. मंगळवारी सायंकाळी कारमधून फिरून आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. रात्री आठच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्‍याने त्यांचे निधन झाले. त्यांनी अभिनय केलेले ‘पिंजरा’, ‘सामना’, ‘सिंहासन’ हे चित्रपट प्रचंड गाजले. तसेच, ‘गिधाडे’, ‘नटसम्राट’, 'सूर्य पाहिलेला माणूस’ ही त्यांची नाटके विशेष गाजली. ‘हेराफेरी’, ‘चलते चलते’, ‘लावारिस’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘गांधी’ आणि इतर अनेक हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला होता.

वाचा श्रीराम लागू यांच्याविषयी 

हे आहेत श्रीराम लागू यांचे शंभर सिनेमे; नाटकांचेही अर्धशतक
नाट्य वादळ विसावले!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: veteran actor shriram lagoo gets state Funeral at pune vaikunth smashanbhumi