दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

पुणे - "मोरूची मावशी', "आई रिटायर होतेय' यांसारख्या गाजलेल्या नाटकांचे दिग्दर्शक आणि "नाट्यदर्पण' पुरस्कार बारा वेळा मिळविणारे  नाट्यकर्मी दिलीप कोल्हटकर (वय 71) यांचे शुक्रवारी पुण्यात निधन झाले. स्मृतिभ्रंशामुळे ते गेली काही वर्षे आजारी होते. 
उद्या (ता. 5) सकाळी दहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. 

हौशी व व्यावसायिक मराठी रंगभूमीवरील एक बहुपेडी व्यक्तिमत्त्व म्हणून कोल्हटकर परिचित होते. बॅंक ऑफ बडोदामधून तीस वर्षे नोकरी करून ते सेवानिवृत्त झाले होते. बॅंकेत नोकरी करत असले तरीही नाटक हाच त्यांच्यासाठी प्राणवायू होता. व्यावसायिक रंगभूमीवर पन्नासहून नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. त्याचबरोबर उत्तम व परिणामकारक प्रकाशयोजना ही त्यांची खासियत होती. 

पं. सत्यदेव दुबे, विजया मेहता यांच्याकडे त्यांनी प्रत्येकी पाच वर्षे, राजा नातू, भालबा केळकर यांच्याकडे प्रत्येकी दोन वर्षे नाट्यकलेचे शिक्षण घेतले होते. उन्मेष युवक प्रायोगिक रंगमंच या नाट्यसंस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होत. 

"मोरूची मावशी', "आई रिटायर होतेय', "उघडले स्वर्गाचे दार', "चारचौघी', "ज्याचा त्याचा प्रश्‍न', "सोनचाफा,' "दीपस्तंभ', "छावा', "आसू आणि हसू,' "गोड गुलाबी' आणि मकरंद राजाध्यक्ष, गोष्ट जन्मांतरीची, पार्टनर, जास्वंदी आदी विविध नाटकांचे व "शेजारी शेजारी' व "ताईच्या बांगड्या' या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. त्यांच्या पश्‍चात मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. नाटककार बाळ कोल्हटकर हे त्यांचे सख्खे काका; तर नटवर्य चित्तरंजन कोल्हटकर हे त्यांचे चुलत चुलते होते.

Web Title: veteran director dilip kolhatkar expired