बिबट्याच्या हल्ल्यात पशुवैद्यकीय डॉक्टर जखमी: प्रसंगावधानामुळे टळली दुर्घटना

रवींद्र पाटे
Monday, 14 September 2020

पशुवैद्यकीय डॉक्टर डॉ.विशाल गोवर्धन थोरात( वय-३८) व त्यांचे सहकारी विजय रामचंद्र थोरात (वय -३३,दोघेही राहणार देवजाळी, हिवरे तर्फे नारायणगाव ,ता.जुन्नर) हे दोघे आज सायंकाळी कळंब (ता.आंबेगाव) येथे आजारी जनावरांवर उपचार करण्यासाठी गेले होते. सायंकाळी साडेसात वाजण्याचा सुमारास डॉ. थोरात सहकारी मित्रा समावेत दुचकीवरून लौकी-कळंब रस्त्याने हिवरे तर्फे नारायणगाव येथे घरी येत होते.

नारायणगाव: जनावरांवर उपचार करून दुचाकीवरून घरी निघालेले हिवरे तर्फे नारायणगाव येथील पशुवैद्यकीय डॉक्टर डॉ.विशाल गोवर्धन थोरात यांच्यावर बिबट्याने झडप घालून त्यांच्या उजव्या पायाच्या पोटरीला चावा घेतला. ही घटना काल(ता.१३) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास लौकी कळंब रस्त्यावर घडली.  प्रसंगावधान राखल्याने डॉ.थोरात बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून वाचले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पशुवैद्यकीय डॉक्टर डॉ.विशाल गोवर्धन थोरात( वय-३८) व त्यांचे सहकारी विजय रामचंद्र थोरात (वय -३३,दोघेही राहणार देवजाळी, हिवरे तर्फे नारायणगाव ,ता.जुन्नर) हे दोघे आज सायंकाळी कळंब (ता.आंबेगाव) येथे आजारी जनावरांवर उपचार करण्यासाठी गेले होते. सायंकाळी साडेसात वाजण्याचा सुमारास डॉ. थोरात सहकारी मित्रा समावेत दुचकीवरून लौकी-कळंब रस्त्याने हिवरे तर्फे नारायणगाव येथे घरी येत होते. दरम्यान लौकी येथील वनविभागाच्या जंगल हद्दीत अंधारात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने दुचकीवरील डॉ. थोरात यांच्यावर झडप मारून त्यांच्या पोटरीचा चावा घेतला.
बिबट्याचे सुळे दात खोलवर घुसल्याने मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाला. दुचकीवर मागे बसलेले विजय थोरात यांनी प्रसंगावधान राखत मोठमोठ्याने आरडाओरडा केल्याने बिबट्याला पसार झाला. नशीब बलवत्तर म्हणून डॉ.थोरात बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातुन वाचले.हिवरे तर्फे नारायणगाव येथील डॉ.प्रविण शिंदे यांनी डॉ.थोरात यांच्यावर  प्रथमोपचार केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जुन्नर ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी​

माऊली खंडागळे (माजी जिल्हा परिषद सदस्य) या भागात बिबट्याच्या हल्ल्यात घोडा, मेंढी, शेळ्या, कुत्री आदी पाळीव जनावरे ठार  झाली आहेत.बिबट्याने आता मानवावर हल्ला केल्याने बिबट्या चवतळला असल्याची शक्यता आहे.या भागातील नागरिकांच्या सुरक्षतेसाठी बिबट्याला पकडण्यासाठी  वनविभागाने पिंजरा लावणे आवश्यक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Veterinarian doctor injured in leopard attack in narayangav