मोबाईल उधारीवर घेऊन फसवणूक करणाऱ्याला अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

पुणे - मोबाईल विक्रेत्याकडून तब्बल सात लाख रुपयांचे मोबाईल उधारीवर घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकाला अटक केली. त्याने दहाहून अधिक विक्रेत्यांची फसवणूक केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. 

पुणे - मोबाईल विक्रेत्याकडून तब्बल सात लाख रुपयांचे मोबाईल उधारीवर घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकाला अटक केली. त्याने दहाहून अधिक विक्रेत्यांची फसवणूक केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. 

याप्रकरणी रमेश चौधरी (वय 29, रा. हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. राजेश वीर सिंह (वय 37, रा. कामठे चाळ, फुरसुंगी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिस निरीक्षक उमाकांत पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी यांचे हडपसर येथे मोबाईल शॉपीचे दुकान आहे. त्यांच्यासह काही मोबाईल विक्रेत्यांकडून सिंह हा काही महिन्यांपासून उधारीवर मोबाईल घेत होता. हे मोबाईल घरोघरी साडी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना तो विकत होता. चौधरी यांच्याकडून फेब्रुवारी महिन्यापासून त्याने सात लाख रुपयांचे मोबाईल घेतले. मात्र मोबाईलचे पैसे वेळेत देण्यास तो टाळाटाळ करत होता. काही दिवसांपासून त्याच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने चौधरी यांनी त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली. 

सिंह याने दहापेक्षा जास्त मोबाईल विक्रेत्यांकडून याच पद्धतीने दोन ते वीस हजार रुपयांपर्यंतचे मोबाईल उधारीवर घेतले होते. मूळचा गुजराती असलेला सिंह हा बंगळूर येथे राहतो. पुण्यात आठ वर्षांपासून तो वास्तव्य करत आहे. प्रारंभी त्याने घरोघरी साडी विक्रीचे काम केले. त्यामध्ये जास्त साड्या खरेदी करणाऱ्यांना खरेदीच्या किमतीनुसार तो मोबाईल देत होता. हा व्यवसाय बंद करून त्याने अन्य साडी विक्रेत्यांना मोबाईल पुरविण्यास सुरवात केली होती. त्या दृष्टीने त्याने अनेक मोबाईल विक्रेत्यांची फसवणूक केल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 

Web Title: victim is arrested on mobile borrowing