पुणे: दुकानाला बाहेरून कुलूप असल्यानेच त्या 5 जणांचा गेला जीव (व्हिडिओ)

पुणे: दुकानाला बाहेरून कुलूप असल्यानेच त्या 5 जणांचा गेला जीव (व्हिडिओ)

उरुळी देवाची (ता. हवेली): हडपसर-सासवड मार्गावर उरुळी देवाची हद्दीतील राजयोग बोलेल साडी सेंटर या कपड्यांचा दुकानाला गुरुवारी (ता. 9) पहाटे साडेचारच्या सुमारास लागलेल्या भीषण लागली. या आगीमध्ये दुकानात झोपलेल्या पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, यावेळी दुकानाला बाहेरून कुलुप होते, म्हणूनच त्यांना जीव गमावावा लागला असल्याचे समोर आले आहे.

दुकानात झोपलेल्या कामगारांचा मॅनेजरला आग लागल्याचा फोन आला होता. चोरी होऊ नये, या उद्देशाने दुकानाला बाहेरून कुलूप लावण्यात येत असे. शॉर्टसर्किटने आग लागल्याने आम्हाला गुदमरत आहे. बाहेर पडता येत नाही. असा फोन दुकानच्या मॅनेजरला आला. पण, मॅनेजर तेथे जाईपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. बाहेरून कुलूप काढल्यानंतर कपडा असल्याने आगीने जोरात पेट घेतला. दुसऱ्या मजल्यावरील काचा फोडण्यात आल्या. मागून भिंत तोडण्यात आली मात्र, त्या चार तासानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. तोपर्यंत ते पाच कामगारांचा आगीने होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाला होता.

दरम्यान, राजयोग साडी सेंटर या दुकानात साडे चार वाजता आग लागली. याबाबत अग्निशामक दलाला साडे चार वाजता खबर मिळाली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या पाच गाडया घटनास्थळी दाखल झाल्या. त्याचवेळी दहा खासगी टँकर मागवण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानानी काही वेलापूर्वी आग आटोक्यात आणली. दुकानामध्ये पाच कामगार काम करत होते. सर्व कामगार दुकानातच झोपत होते. त्यामुळे पाचही कामगार भाजले. त्यामध्ये काहींचा गुदमरुन तर काही जणांचा भाजल्याने मृत्यु झाला आहे. पाचही कामगारांचे मॄतदेह बाहेर काढले असुन, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार व त्यांचे सहकारी घटनास्थळी आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com