श्रीमंत महादजी शिंदे यांच्या विजयाचा सोहळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

वडगाव मावळ : श्रीमंत महादजी शिंदे यांचा ब्रिटिशांवरील विजयाचा सोहळा महाराष्ट्र गिरीभ्रमण संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. वडगाव मावळ येथे 16 जानेवारी 1779 रोजी श्रीमंत महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मराठा फौजांनी कॅप्टन जेम्स स्टुअर्ट यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश फौजांचा पराभव केला. या विजयाच्या स्मृती जागविण्याच्या हेतूने संस्थेने कार्यक्रम आयोजित केले होते.

इतिहासातील मराठी शाहीचा हा अखेरचा विजय तर ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळला नव्हता, त्या ब्रिटिशांचा हा अखेरचा मानहानिकारक पराभव होता. सकाळी मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नीलेश काळे यांच्या हस्ते गडांवरून आणण्यात आलेल्या जलकुंभाद्वारे श्रीमंत महादजी शिंदे यांच्या पुतळ्याला अभिषेक घालण्यात आला. साडेचार वाजता बॅंडपथकासह सजविलेल्या ट्रॅक्‍टरमधून महादजी शिंदे यांच्या प्रतिमेची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर विजय स्मारकाजवळ ब्रिगेडियर सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कारांचे वितरण झाले.

श्रीमंत नाना फडणीस यांचे वंशज अशोक फडणीस, श्रमिक गोजमगुंडे, प्रमोद बोऱ्हाडे, इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे, सोपानराव म्हाळसकर, सुभाष जाधव, मंगेश ढोरे, सुनील चव्हाण, दीपक बवरे, दत्तात्रेय कुडे, पंढरीनाथ ढोरे, सुनील ढोरे, नितीन कुडे, राजेंद्र कुडे, मनोज ढोरे, अनंता कुडे, गंगाराम ढोरे, प्रवीण ढोरे, मयुर ढोरे उपस्थित होते. श्रीदत्त राऊत व शरीरसौष्ठवपटू विक्रम भिडे यांना महादजी शिंदे पुरस्कार देण्यात आला. दिलीप चव्हाण यांनी स्वागत केले. ऍड. रवींद्र यादव यांनी प्रास्ताविक केले. तुषार वहिले व मंगेश खैरे यांनी सूत्रसंचालन केले. ऍड. अजित वहिले यांनी आभार मानले. दीपोत्सवाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Web Title: victory celebration shrimant mahadji shinde