विजयस्तंभ अभिवादन दिन; दिवसभराच्या अपडेटसाठी वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 January 2021

अनेक मान्यवर व आंबेडकरी बांधवांनी आज दिवसभर विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा नजीक पेरणेफाटा (ता. हवेली) येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर प्रतिकात्मक करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. मात्र तरीही अनेक मान्यवर व आंबेडकरी बांधवांनी आज दिवसभर विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

Welcome 2021 : न्यूझीलंडमध्ये झालं नव्या वर्षाचं भन्नाट स्वागत; पाहा व्हिडिओ! 

आज दिवसभर विविध पक्ष, संघटनांच्या वतीने अनेक मान्यवरांनी येथे येत विजयस्तंभास मानवंदना दिली. प्रमुख मान्यवरात उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, उर्जामंत्री नितीन राऊत, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे,  तसेच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर, भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर,  दलित कोब्राचे अ‍ॅड. भाई विवेक चव्हाण, बहुजन समाज पार्टी, भीमा कोरेगाव  विजय रणस्तंभ सेवा संघाचे सर्जेराव वाघमारे, रिपब्लिकन सेनेचे विवेक बनसोडे, युवराज बनसोडे, आदींसह विविध संस्था व पदाधिकार्‍यांचा यामध्ये समावेश होता.

तर शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार, सुनिल टिंगरे, गौतम चाबुकस्वार तसेच बार्टीसह अनेक संस्थांच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी भेटी देवून मानवंदना दिली. पेरणेफाटा (ता. हवेली) येथील अभिवादन  कार्यक्रमास रात्रीपासूनच बुद्धवंदनेने सुरवात झाली. आज सकाळी समता सैनिक दलाच्या वतीने विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली.

Welcome 2021: दरवर्षी गर्दीने गजबजून जाणारे पुण्यातील रस्ते पडले ओस!​

जिल्हा प्रशासन, तसेच कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ व पेरणे ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने येथील संपुर्ण कार्यक्रमाच्या व्यवस्थेचे सुनियोजन करण्यात आले. तर यावर्षी कोरोनाच्या पार्श्वमीवर हा कार्यक्रम  प्रतिकात्मक करण्यासाठी घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन प्रशासनाने नागरीकांना केले होते. तसेच दुरदर्शन व इतर वाहीन्यांसह अनेक समाजमाध्यमांवर कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले. त्यामुळे दुरदर्शनसह इतर अनेक वाहीन्यांच्या ओबीव्हॅन्सने हा स्तंभपरिसर भरुन गेला होता. 

सकाळी रस्ते मोकळे, दुपारी गर्दी- दरम्यान यावर्षी कोरोनामुळे सभा, संमेलने, मेळावे, पुस्तक प्रदर्शनास बंदी तसेच पासशिवाय प्रवेश नसल्याने दरव्ही गर्दीने फुललेला नगर रस्ता सकाळी मोकळाच दिसत होता. रस्त्यांवर केवळ पोलिस तसेच विविध पक्ष, संघटना पदाधिकाऱ्यांची वाहनेच दिसत होती. मात्र तरीही दुपारनंतर अभिवादनासाठी मोठी गर्दी वाढली होती. सायंकाळी उशिरापर्यंत अभिवादनासाठी अनेक बांधव येत होते.  

श्वान आणि रिक्षावाल्याची हृदयस्पर्शी गोष्ट; लेखिकेची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल!​  

प्रशासनाचे चोख नियोजन- मानवंदनेसाठी आलेल्यांचे नियोजन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने स्तंभस्थळी केलेली अंतर्गत अभिवादन व्यवस्था, तसेच आत व बाहेर जाण्यासाठी उत्तम व्यवस्था केली होती. तसेच सुविधांसाठी जिल्हाधिकारी, जिल्हा शिरुर-हवेलीचे प्रांताधिकारी, तसेच विविध विभागाचे अधिकारी जातीने लक्ष ठेवून होते. तर बंदोबस्तासाठी पोलिस महानिरीक्षकांसह जिल्हा पोलिस अधिक्षक व अनेक वरीष्ठ पोलिस अधिकारी जातीने  लक्ष ठेवून होते.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: victory pillar greetings day read detailed for updates