अश्लिल व्हिडिओ काढून तरूणीस केले ब्लॅकमेल

संदीप घिसे
बुधवार, 12 डिसेंबर 2018

साईनाथ शेट्टी (वय ४४, सध्या रा. ग्रीन्स, थेरगाव. कायमचा पत्ता मयूर टॉवर, मरोळ, अंधेरी इस्ट, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिंपरी (पुणे) लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्या तरूणीकडून सात लाख रुपये उकळले. ही घटना हिंजवडी येथे घडली. 

साईनाथ शेट्टी (वय ४४, सध्या रा. ग्रीन्स, थेरगाव. कायमचा पत्ता मयूर टॉवर, मरोळ, अंधेरी इस्ट, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सप्टेंबर २०१७ ते ११ डिसेंबर २०१८ या कालावधीमध्ये घडली. 

आरोपी शेट्टी यांनी पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत त्याची व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर टाकण्याची धमकी देत वेळोवळी तिला ब्लॅकमेल करीत तिच्याकडून सहा ते सात लाख रुपयांच्या महागड्या वस्तू घेतल्या. गरोदर असतानाही जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.  त्यानंतर तिला शिवीगाळ करीत मारहाणही केली. कुटुंबास जिवे मारण्याची धमकी देत शारीरिक व मानसिक छळ केला. उपनिरीक्षक कविता रूपनर याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: video taken by the teenager Blackmail in Pimpri