
कात्रज घाटातून प्रवास करणाऱ्या दोघांना सकाळी हे बाळ दिसले. कात्रज घाटात रस्त्याच्या बाजूला असलेल्या कचऱ्यात अवघ्या एका दिवसाच्या बाळाला टाकून देण्यात आले होते.
कात्रज (ता. १८) : कात्रज पोलिसांनी जबाबदारीचे भान राखत कात्रज घाटात फेकून दिलेल्या एका दिवसाच्या बाळाला जीवनदान दिले आहे. पुणे पोलिस दलातील एका सहायक महिला पोलिस निरिक्षकांच्या तप्तरतेमुळं या बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.दरम्यान, बाळाला रुग्णालयात घेऊन जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान शेअर होत आहे.
असे मिळाले बाळाला जीवदान?
कात्रज घाटातून प्रवास करणाऱ्या दोघांना सकाळी हे बाळ दिसले. कात्रज घाटात रस्त्याच्या बाजूला असलेल्या कचऱ्यात अवघ्या एका दिवसाच्या बाळाला टाकून देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना दिली. माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी जबाबदारीचे भान ओळखले आणि घटनास्थळ गाठले. घटनास्थळी कात्रज पोलिस चौकीच्या पोलिसांसह भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षक मधुरा कोराणे या पोहोचल्या असता हे बाळ जिवंत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी हे बाळ ताब्यात घेत दुचाकीवरून बाळाला रूग्णालयात दाखल केले.
बाळाला घेऊन जाताना महिला पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल
बाळाला दुचाकीवरून घेऊन जातानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून महिला पोलिस अधिकारी मधुरा कोराणे यांचे कौतुक होत आहे. त्यांनी जबाबदारीचे भान ओळखत केलेल्या कामामुळेच १ दिवसाच्या बाळाला जीवनदान मिळाले आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोठे सापडले हे बाळ?
कात्रज घाटातील अरिहंत शाळेच्या परिसरात हॉलिडे रिसॉर्टच्या पुढे भिलारेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत हे बाळ सापडले.
बाळाची प्रकृती स्थिर
बाळ पुरुष जातीचे असून त्याचा रंग गोरा आहे. बाळाची उंची साधारणतः दीड फूट असून अंगात एक शर्ट घातलेला होता आणि एका कापडामध्ये गुंडाळून हे बाळ रस्त्याच्या कडेला टाकलेले होते. बाळाला आता ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार चालू आहेत. सध्या बाळ सुस्थितीत असल्याची माहिती मचाले यांनी दिली आहे.
राज्याभिषेक दिन सोहळा शिवस्वराज्य दिन होणार!
कात्रज पोलिसांनी जबाबदारीचे भान राखत कात्रज घाटात एका दिवसाच्या फेकून दिलेल्या बाळाला जीवनदान दिले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास हे कात्रज पोलिस चौकीचे पोलिस उपनिरिक्षक समाधान मचाले हे करत आहेत.