Vidhan Sabha 2019 : विकासकामांचा डोंगर हीच माझी ओळख : आमदार टिळेकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

पुणे : हडपसर मतदार संघात उभा केलेला विकास कामांचा डोंगर हीच माझी ओळख आहे. त्यामुळेच महायुतीतील घटक पक्षांसह सर्वसामान्य मतदार मला याहीवेळी विशेष यश मिळवून देतील, असा आत्मविश्वास महायुतीचे हडपसरचे उमेदवार योगेश टिळेकर यांनी व्यक्त केला.

पुणे : हडपसर मतदार संघात उभा केलेला विकास कामांचा डोंगर हीच माझी ओळख आहे. त्यामुळेच महायुतीतील घटक पक्षांसह सर्वसामान्य मतदार मला याहीवेळी विशेष यश मिळवून देतील, असा आत्मविश्वास महायुतीचे हडपसरचे उमेदवार योगेश टिळेकर यांनी व्यक्त केला.

पदयात्रेचे आयोजन
भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, व रयत क्रांती महायुतीचे अधिकृत उमेदवार भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष   योगेश टिळेकर यांना पुन्हा हडपसरमधून संधी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ मुंढवा-केशवनगर परिसरात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी स्वागतासाठी पुढे येत असलेल्या नागरिकांशी संवाद साधताना टिळेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पालिकेतील भाजपाचे गटनेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक उमेश गायकवाड, नगरसेविका अश्विनी पोकळे, जिल्हा परिषद सदस्या वंदना कोद्रे, पंचायत समिती सदस्य जितेंद्र भंडारी, शिवसेना शहर प्रमुख नाना वाडेकर, विभाग प्रमुख दिलीप व्यवहारे, संकेत लोणकर, नीलेश गायकवाड, तुषार शिर्के, महादेव धंदी, माजी सरपंच संदीप लोणकर, सरपंच शिवराज घुले, उपसरपंच पुरुषोत्तम धारवाडकर यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते व नागरिक पदयात्रेत सहभागी झाले होते.

पुन्हा एकदा संधी द्या
पदयात्रेदरम्यान, टिळेकर यांचे ठिकाणी रांगोळी काढून, फुलांचा वर्षाव करून, घोषणा देत जोरदार स्वागत होत होते. या भागात गेल्या पाच वर्षात आमदार टिळेकर यांनी जल वाहिन्यांचे जाळे, अंतर्गत व मुख्य रस्त्यांची नियोजनपूर्वक बांधनी, अखंडित वीजपुरवठा व वैयक्तिक लाभाच्या अनेक योजनांतून सर्वसमावेशक विकास साधण्याचे काम केले असल्याची भावना नागरिक ठिकाणी व्यक्त करत होते. त्यांच्या कामाचा झपाटा आणि तितक्याच नम्रतेने नागरिकांशी जुळवलेले स्नेहबंध हीच त्यांची खरी ओळख ठरली आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी पुन्हा एकदा त्यांना आशिर्वाद देवून त्यांना पुन्हा एकदा नेतृत्वाची संधी द्यावी, असे आवाहन कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी दुतर्फा स्वागतासाठी उभ्या असलेल्या नागरिकांना केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 bjp leader yogesh tilekar rally in hadapsar constituency