Vidhan Sabha 2019: चंद्रकांत पाटील यांना ब्राह्मण महासंघाचा विरोध

टीम ई-सकाळ
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

पुणे : पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्याची चर्चा जोर धरताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

पुणे : पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्याची चर्चा जोर धरताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरविण्याच्या हालचालींना पुणे ब्राह्मण महासंघाने विरोध केला आहे. ‘पुणे शहराने भाजपला नेहमीच साथ दिली आहे. त्यामुळे पाटील यांच्यासारख्या ब्राम्हण द्वेष करणाऱ्या व्यक्तीला तिकिट नको,’ अशी भूमिका महासंघाने मांडली आहे.

दादा हे वागणं बरं नव्हं!

मेधा कुलकर्णींचे समर्थक आक्रमक
विधानसभा निवडणुकीसाठी पुण्यातील आठ मतदासंघातील भाजप उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा सोमवारी सायंकाळपर्यंत होण्याची शक्‍यता आहे. त्यात काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट होण्याचा अंदाज आहे. त्यात कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून त्यांच्याऐवजी पुण्याचे पालकमंत्री, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव निश्‍चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य सरकारमधील महत्त्वाच्या खात्यासह प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी असलेले पाटील हे विधानपरिषदेचे सदस्य आहेत. आरोप-प्रत्यारोपाच्या सामन्यात पाटील हे विरोधकांच्या टीकेचे धनी ठरत आहेत. या पार्श्‍वभूमीवर राजकीय दृष्ट्या सुरक्षित मतदारसंघ म्हणून, पाटील यांना कोथरूडमधून रिंगणात उतरविण्याची भाजपची खेळी आहे. त्यात आमदार कुलकर्णी यांचे तिकिट कापले जाणार असल्याचे स्पष्ट आहे. त्याला ब्राह्मण महासंघाने विरोध केला आहे.

कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील विरुद्ध चंद्रकांत मोकाटे

चंद्रकांत पाटील ब्राह्मणद्वेष्टे असल्याचा आरोप
कोल्हापुरातील मंदिरातून ब्राह्मण समाजाला हाकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या, दादोजी कोंडदेव, गडकरी यांच्या पुतळ्याला न्याय न देणाऱ्या ब्राह्मणद्वेष्ठया व्यक्तीला पुण्यातून उमेदवारी देऊ नये. तसे झाल्यास त्याला ब्राह्मण समाजाचा विरोद असेल, असे महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी पत्रकात म्हटले आहे. प्रसंगी ब्राह्मण महासंघाकडून उमेदवारी दिला जाईल, असा इशारा दवे यांनी दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 brahman mahasangh opposes chandrakant patil kothrud pune