Vidhan Sabha 2019 : सेलिब्रिटींचे उत्साहात मतदान

celebrity voting
celebrity voting

विधानसभा 2019 
पुणे - मतदानाचे पवित्र कार्य पार पाडण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे नाटक, मालिका व चित्रपटांमधील अनेक कलाकारांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. 

पुणे शहर, पिंपरी व जिल्ह्यामध्ये जवळपास ७० ते ८० जण अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. यातील बहुतांश जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच, ‘सकाळ’च्या IWILLVOTE या कॅम्पेनचाही आवर्जून उल्लेख केला. अनेक कलाकारांनी चित्रीकरणाच्या वेळा ॲडजेस्ट करून सकाळी-सकाळी मतदानाचा हक्क बजाविला. काही कलाकारांनी सकाळी चित्रीकरण संपवून दुपारच्या वेळेमध्ये मतदान केले. काही ठिकाणी आज मतदानासाठी सुटी देण्यात आली होती. विशेष म्हणजे अनेक कलाकार मुंबई, सातारा, नाशिक, नागपूर व कोल्हापूरवरून खास मतदानासाठी पुण्यात आले होते. अनेकांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत मतदान करून तसेच सेल्फी काढून ते आपल्या सोशल मीडियाच्या साइट्‌सवर शेअर केले होते. 

मी लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्येही मतदान केले. मात्र, या वेळी मतदान केंद्रांमधील व्यवस्था अतिशय चांगली होती. अवघ्या १० मिनिटांमध्ये मला मतदान करता आले. तसेच, अनेक ठिकाणी विविध पक्षांचे कार्यकर्ते व सरकारी यंत्रणा मतदारांना मदत करताना दिसत होते, असे अभिनेता सौरभ गोखले यांनी सांगितले. सोनाली कुलकर्णी यांनी निगडीतील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला. चिंचवडमधील श्री फत्तेचंद स्कूलमध्ये सकाळी नऊ वाजता अभिनेत्री प्रियांका यादव, नाट्यअभिनेते डॉ. संजीवकुमार पाटील, पं. नंदकिशोर कपोते, नृत्यांगना तेजश्री अडीगे, गीता शर्मा यांनीही मतदान केले. काहींनी कुटुंबासह फोटो सोशल मीडियावर अपलोड केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com