Vidhan Sabha 2019 : शिवतारेंनी ते वक्तव्य मागे घ्यावे अन्यथा : जालिंदर कामठे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

पुणे : ''राज्याचे जलसंधारणमंत्री शिवसेनेचे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विजय शिवतारे यांनी भाजपविषयी अवमानकारक वक्तव्य केले आहे. यातून त्यांनी भाजपला कमी लेखले आहे. त्यामुळे शिवतारे यांनी भाजपविषयी केलेले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे,'' अशी मागणी पुरंदर तालुक्यातील भाजप नेते जालिंदर कामठे यांनी केली आहे.  

Vidhan Sabha 2019 : पुणे : ''राज्याचे जलसंधारणमंत्री शिवसेनेचे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विजय शिवतारे यांनी भाजपविषयी अवमानकारक वक्तव्य केले आहे. यातून त्यांनी भाजपला कमी लेखले आहे. त्यामुळे शिवतारे यांनी भाजपविषयी केलेले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे,'' अशी मागणी पुरंदर तालुक्यातील भाजप नेते जालिंदर कामठे यांनी केली आहे. 

शिवतारे यांनी ते वक्तव्य मागे न घेतल्यास भाजपचे कार्यकर्ते शिवतारे यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार नाहीत आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा आदेश येईपर्यंत प्रचारही करणार नाहीत, असा इशाराही कामठे यांनी दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Vidhan Sabha 2019 Jalandhar Kamthe warn Shivatare about withdraw his statement