खडकवासला येथे सहा तासात 28टक्के मतदान

vidhan sabha 2019 khadakwasala 28 percent voting in six hourse
vidhan sabha 2019 khadakwasala 28 percent voting in six hourse

खडकवासला (पुणे): खडकवासला विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 ते दुपारी एक वाजेपर्यंत या सहा तासात 28 टक्के मतदान झाले आहे. सकाळच्या टप्यात मतदान करणाऱ्यांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त आहे .आता दुपारच्या टप्प्यात महिलां मतदारांची संख्या वाढली आहे.

एकूण 4लाख 86 हजार मतदारांपैकी पहिल्या चार तासात 75 हजार 668 जणांनी मतदान केले होते. दुपारी एक वाजेपर्यंत एक लाख 35 हजार 293 जणांनी मतदान केले आहे. यामध्ये पुरुष 79हजार 532 व महिला 55हजार 761 मतदारांनी मतदान केले आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षक साजिद इस्लाम रशीद या विविध मतदान केंद्रावर जाऊन थेट भेट घेत असल्याने निवडणूक यंत्रणेवर त्यांचे लक्ष आहे. त्यांच्या समवेत अन्य अधिकरी होते. सनसिटी, शिवणे, उत्तमनगर, परिसरात भेट दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com