Vidhan Sabha 2019 : अन् त्याचवेळी भरपावसात नातूही गरजत होता (व्हिडिओ)

अशोक गव्हाणे
Friday, 18 October 2019

आज (ता.18) साताऱ्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आपले भाषण सुरु ठेवले अन तब्बल सात ते दहा मिनिटांच्या भाषणातून शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना उर्जा दिली. शरद पवार यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला असतानाच त्यांचे नातू रोहित पवार यांनीही त्याच वेळेला भर पावसात सभा घेतली आहे.

कर्जत-जामखेड : आज (ता.18) साताऱ्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आपले भाषण सुरु ठेवले अन तब्बल सात ते दहा मिनिटांच्या भाषणातून शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना उर्जा दिली. शरद पवार यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला असतानाच त्यांचे नातू रोहित पवार यांनीही त्याच वेळेला भर पावसात सभा घेतली आहे.
 

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून शरद पवार याचे नातू रोहित पवार हे निवडणूक लढवत आहेत. त्यांची आज (ता.18) कर्जतमधील कोरेगांव येथे नियोजित सभा होती, नेमका या सभेवेळीही पाऊस आला. पण, रोहित पवार हेही शरद पवार याच्याप्रमाणेच भर पावसात बोलत राहिले. यावेळी त्यांनी भाजप-सेना सरकारवर टीका केली असून, येत्या 21 तारखेला राष्ट्रावदी काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील आणि विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवारांना विजय करण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज (शुक्रवार) राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे सर्वेसर्वो शरद पवार यांची जिल्हा परिषद मैदानावर सभा आयोजिली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 ncp leader sharad pawar rohit pawar speech in heavy rain