Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादीचे सचिन दोडके यांचे धनकवडीत शक्तीप्रदर्शन

Vidhan Sabha 2019 NCP Sachin Dodke rally in Dhankawadi
Vidhan Sabha 2019 NCP Sachin Dodke rally in Dhankawadi

वारजे : विधानसभेच्या मतदानाला थोडेच दिवस शिल्लक राहिले असल्याने खडकवासला मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व आघाडीचे अधिक्रुत उमेदवार सचिन दोडके यांनी आज धनकवडी परिसरात पदयात्रा काढून धनकवडीकरांचा प्रतिसाद मिळविला.

शेकडो नागरिक व महिला उत्स्फूर्तपणे या पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. 'सचिन आला रे आला' या घोषणांनी धनकवडी परिसर दुमदुमला. सचिन 'आगे बडो हम तुम्हारे साथ है' अशा घोषणा देण्यात आल्या.

धनकवडी गावाचे ग्रामदैवत जानूबाई देवीचे दर्शन घेऊन दोडके यांनी पदयात्रेला सुरुवात केली. तानाजी नगर, मोहन नगर, वनराई कॉलोनी, नवनाथ नगर, सावरकर चौक, धनकवडी गावठाण, धनकवडी बसस्टॉप, गुलाब नगर, गणेश नगर, दौलत नगर, चैतन्य नगर अशी पदयात्रा काढून राजमुद्रा सोसायटी येथे समाप्ती करण्यात आली. 

माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, बाप्पू धनकवडे, नगरसेवक विशाल तांबे,  नगरसेवक बाळा धनकवडे, नगरसेविका अश्विनी भागवत, अप्पा रेणुसे, युवराज रेणुसे, संतोष फरांदे, विलास भणगे, आप्पा परांडे, श्रध्दा परांडे, सुनील वाघ, अँड विजय खोपडे, नाना जगताप आदी कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com