Vidhan Sabha 2019 :  पंतप्रधान मोदींच्या दौरा जाहीर; वाचा कोठे होणार जाहीर सभा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

पुणे : निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पुण्यात येत्या गुरुवारी (ता. 17) सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. त्यानंतर, मोदी यांची प्रचाराची सांगता सभा मुंबईत शुक्रवारी (ता. 18) होणार आहे.

पंतप्रधान मोदींसाठी आता 'एअर इंडिया वन'

पुणे : निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पुण्यात येत्या गुरुवारी (ता. 17) सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. त्यानंतर, मोदी यांची प्रचाराची सांगता सभा मुंबईत शुक्रवारी (ता. 18) होणार आहे.

पंतप्रधान मोदींसाठी आता 'एअर इंडिया वन'

असा असेल मोंदीचा कार्यक्रम
मोदी यांची गुरुवारी पहिली सभा परळी येथे भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या मतदारसंघात होणार आहे. त्यानंतर, त्यांची दुसरी सभा सातारा येथे होईल. लोकसभा पोटनिवडणुसाठी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि विधानसभेसाठीचे पक्षाचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारासाठी मोदी सातारा येथे सभा घेणार आहेत. पंतप्रधान नांदेड विमानतळावरून पुण्यात येणार आहेत. पुण्यातून हेलिकॉप्टरने ते सातारा येथे दुपारी साडेतीन वाजता पोहोचतील. तेथे तासभर सभा झाल्यानंतर ते पुन्हा पुण्यात परत येतील. पुण्यात त्यांची सभा सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. पावणेसातच्या सुमाराला ते दिल्लीकडे रवाना होतील. सभेचे ठिकाण अद्याप निश्‍चित झालेले नाही. स. प. महाविद्यालयाच्या मैदानात ही सभा आयोजित करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. मोदी यांच्या सभेच्या तयारीसाठी खासदार गिरीश बापट यांनी आज भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी यांची बैठक घेतली.

थोरात म्हणतात, भाजप मजेशीर पक्ष

मोदींची सभा हमखास यश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आणि निवडणुकीतील यश, हे निश्चित मानलं जातं. 2014च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये हे पहायला मिळालं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्येही ज्या ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदींनी सभा घेतल्या तेथे भाजपला यश आले आहे. त्यामुळे आपल्याच मतदारसंघात मोदींची सभा व्हावी, यासाठी नेते आग्रही आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 pm narendra modi campaign schedule Maharashtra election