Vidhan Sabha 2019 : कॅन्टोन्मेंटमध्ये तीन वाजेपर्यंत अवघे 22 टक्केच मतदान

कॅन्टोन्मेंटमध्ये तीन वाजेपर्यंत अवघे 22 टक्केच मतदान
कॅन्टोन्मेंटमध्ये तीन वाजेपर्यंत अवघे 22 टक्केच मतदान

पुणे : कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत सुमारे 22 टक्केच मतदान झाल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली आहे. मतदानाबद्दल उच्चभ्रू मतदारांची उदासीनता, हे त्या मागचे कारण असल्याचे दिसून आले.

या मतदारसंघात पहिल्या दोन तासात म्हणजे सकाळी 7 ते 9 दरम्यान अवघे 6 टक्के मतदान झाले होते. ताडीवाला रोड, कासेवाडी, राजेवाडी, हरकानगर, रास्ता पेठ, मंगळवार पेठ, रेल्वे वसाहत, कोरेगाव पार्क, घोरपडी, वानवडी आदी भागातील पोलिंग बूथवर दुपारी 12 नंतर गर्दी होऊ लागली. परंतु, दुपारी तीनवाजेपर्यंत फक्त 22 टक्केच मतदान झाले. सोसायट्यामध्ये रहाणारे मतदार बाहेर पडावे, यासाठी सगळेच राजकीय पक्ष प्रयत्न करीत आहेत. परंतु, त्यांना थंडा प्रतिसाद मिळत असल्याचे 'सकाळ'ने केलेल्या पाहणीत आढळून आले. वस्ती भागातील मतदार अजूनही उमेदवारांची 'वाट' पाहत असल्याचेही दिसून आले.

या मतदारसंघात 270 बूथ असून 2 लाख 92 हजार मतदार आहेत. भाजपचे सुनील कांबळे आणि काँग्रेसचे रमेश बागवे यांच्यात येथे प्रमुख लढत होत आहे. या मतदारसंघात एकूण 28 उमेदवार रिंगणात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com