Vidhan Sabha 2019 : पुणे जिल्ह्यात 28.80 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

पुणे: विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी 28.80 टक्के मतदान झाले. शहरी भागात मतदानाचा वेग कमी असून, ग्रामीण भागातील मतदारसंघांत मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क मोठ्या प्रमाणात बजावला.

पुणे: विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी 28.80 टक्के मतदान झाले. शहरी भागात मतदानाचा वेग कमी असून, ग्रामीण भागातील मतदारसंघांत मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क मोठ्या प्रमाणात बजावला.

जिल्ह्यात सर्वांत कमी मतदान कसबापेठ व पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात नोंदविले गेले. कसबा पेठ मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत 18.57 टक्के, तर पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात 18.82 टक्के मतदारांचे मतदान झाले होते. शहरातील आठ मतदारसंघांपैकी सर्वांधिक मतदान हडपसरमध्ये 29.16 टक्के, तर खडकवासलामध्ये 27.79 टक्के झाले आहे. अन्य मतदारसंघांपैकी कोथरुड 24.65 टक्के, पर्वती 24.01 टक्के, वडगावशेरी 22.6 टक्के आणि शिवाजीनगर 20 टक्के मतदान झाले.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील तीन मतदारसंघांपैकी चिंचवडमध्ये सर्वांधिक 34.41 टक्के, भोसरीमध्ये 26.52 टक्के, तर पिंपरीमध्ये सर्वांत कमी म्हणजे 21.69 टक्के मतदानाची नोंद झाली.

ग्रामीण भागात उत्साह
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. आंबेगाव व बारामतीमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत सर्वांधिक मतदान झाले आहे. जुन्न 35.3 आंबेगावमध्ये 38.26 टक्के, बारामतीत 37.61 टक्के मतदानाची नोंद झाली. भोरमध्ये 36.15 टक्के, मावळमध्ये 35.4 टक्के, इंदापूर 34.31 टक्के, खेड 32.21 टक्के मतदानाची नोंद झाली. जिल्ह्यामध्ये दुपारी एक वाजेपर्यंत तीन मतदारसंघांत 30 टक्‍क्‍यांपेक्षा कमी मतदानाची नोंद झाली. शिरुर 29.92 टक्के, दौंड 29.03 टक्के आणि पुरंदरमध्ये 28.2 टक्के मतदान झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 pune district 28.80 percent voting