Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादी काँग्रेसचं रॅप साँग पाहिलं का? (व्हिडिओ)

टीम ई-सकाळ
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

पुणे :  'राष्ट्रवादी पुन्हा...' या गाण्याच्या माध्यामतून मतदारांना साद घालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचं एक रॅप साँग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'विकासाच्या नावावर राज्य तुम्ही करायचं, सांगा आम्ही पोट कसं भरायचं?', असा प्रश्न या रॅप साँगच्या माध्यमातून राज्य सरकारला विचारण्यात आलाय.

पुणे :  'राष्ट्रवादी पुन्हा...' या गाण्याच्या माध्यामतून मतदारांना साद घालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचं एक रॅप साँग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'विकासाच्या नावावर राज्य तुम्ही करायचं, सांगा आम्ही पोट कसं भरायचं?', असा प्रश्न या रॅप साँगच्या माध्यमातून राज्य सरकारला विचारण्यात आलाय.

तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीकडून आलेल्या नोटिसनंतर उठलेल्या वादळामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळालं. खासदार डॉ. अमोल कोल्हे, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी, सक्षणा सलगर, अशी तरुण नेत्यांची फळी सध्या राष्ट्रवादीने प्रचाराच्या मैदानात उतरवली आहे. गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादीकडून दुरावलेल्या आणि भाजपच्या गोटात गेलेल्या तरुण वर्गाला आकर्षित करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने रॅप साँगच्या माध्यमातून सध्याच्या बेरोजगारीवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनेलवर सध्या हे रॅप साँग पोस्ट करण्यात आलंय.

राजे जनताच तुम्हाला शिक्षा करेल!

काय आहे व्हिडिओमध्ये?
रोजगार नाही, £महागाईचा भडिमार होतोय, श्रीमंतांच्या खाली गरीब कामगार दबला जातोय, अशी परिस्थिती असल्याचं व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलंय. अब की बार, अब की बार म्हणत गंडवलंय बार बार, अशा शब्दांमधून भाजपचा समाचार घेण्यात आलाय. सामान्यांना खायला तूरडाळ नाही, असे दाखवताना व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांचा मेजवानीचा फोटोही व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलाय.

राहुल गांधी महाराष्ट्रात प्रचार करणार नाहीत?

पुणे का तुंबते?

 #मीसाहेबांसोबत
गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियावर आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीने सध्या  #मीसाहेबांसोबत, असा हॅशटॅग सुरू केला आहे. त्यालाप्रतिसादही चांगला मिळत असून, शरद पवार यांना ईडीने नोटिस पाठवल्यानंतर राष्ट्रवादीने सोशल मीडियावर कारवाई विरोधात मोहीम उघडली होती. त्याला प्रतिसाद वाढत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhan sabha 2019 sharad pawar ncp launches rap song youth unemployment