मतदारांना पैसे देण्यासाठी आलेल्या दोघांना पकडले

मतदारांना पैसे देण्यासाठी आलेल्या दोघांना पकडले
मतदारांना पैसे देण्यासाठी आलेल्या दोघांना पकडले

भोर (पुणे): तालुक्याच्या वीसगाव खोऱ्यातील हातनोशी (ता. भोर) येथे मतदारांना पैसे देण्यासाठी आलेल्या दोघांना ग्रामस्थांनी पकडले. सुनील कोंडीराम जाधव व आनंदा दगडू मस्के (दोघेही रा पळसोशी)अशी त्यांची नावे असून, आज (सोमवार) पहाटे तीन वाजता ग्रामस्थांनी त्यांना पकडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास हातनोशीचे सरपंच प्रमोद अशोकराव थोपटे हे इतर तीन ग्रामस्थांना समवेत ग्रामपंचायतीसमोर उभे होते. त्यावेळी त्यांच्याजवळ मारुती मोटार (क्रमांक एम एच12, क्यूवाय 2825) मधून वरील दोघेजण आले. ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी विचारपूस केली असता त्यांच्याकडे 70 हजार रुपये रोख आणि दहा गावांची यादी लिहिलेली आढळली. ग्रामस्थांनी मोटारीसहीत दोघांना भोर पोलिसांच्या ताब्यात दिले. सरपंच प्रमोद थोपटे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. सुनील जाधव व आनंद मस्के हे दोघे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे समजले. यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com