Vidhan Sabha 2019 दिलीप मोहिते म्हणाले माझं मतदान झालं का?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

चाकण (पुणे) : खेड विधानसभा मतदासंघातील महाआघाडीचे उमेदवार दिलीप मोहिते यांनी मतदान केले, पण मशीनमधून आवाज न आल्याने मतदान झाले की नाही असा प्रश्न मोहिते यांना पडला.

 

चाकण (पुणे) : खेड विधानसभा मतदासंघातील महाआघाडीचे उमेदवार दिलीप मोहिते यांनी मतदान केले, पण मशीनमधून आवाज न आल्याने मतदान झाले की नाही असा प्रश्न मोहिते यांना पडला.

शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील मतदान केंद्रावर महाआघाडीचे उमेदवार माजी आमदार दिलीप मोहीते यांनी आज सकाळी पावणेअकराच्या सुमारास मतदान केले. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मोहिते व त्यांची पत्नी सुरेखा आले होते. दोघांनीही एकामागे एक मतदान केले. अगोदर सुरेखा मोहिते यांनी मतदान केले. त्यानंतर उमेदवार मोहीते यांनी मतदान केले. मोहिते यांनी इव्हीएम मशिनवरील चिन्हा समोरील बटन दाबल्यानंतर आवाज येतो तो आला नाही. त्यामुळे त्यांनी मतदान केंद्रातील कर्मचाऱ्याला विचारले. माझ मतदान झालं का, आवाज आला नाही. त्यानंतर कर्मचारी म्हणाला तुमच मतदान झाले आहे. आवाज येईल. आणि काही सेकंदाने आवाज आला. मग मतदान झाल्याची उमेदवार दिलीप मोहीते यांची खात्री झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha Election 2019