Vidhan Sabha 2019 दौंड "राष्ट्रवादी'मध्ये "तू-तू, मैं-मैं'

Rashtrawadi
Rashtrawadi

केडगाव (पुणे) : दौंड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये विधानसभा निकालावरून सध्या "तू-तू, मैं-मैं' चालू आहे. राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार रमेश थोरात ज्या गावात आघाडीवर आहेत त्या गावातील पदाधिकारी पिछाडीवरील गावातील पदाधिकाऱ्यांबाबत आरोप-प्रत्यारोप करीत आहेत.

"सकाळ'ने ""राष्ट्रवादी'च्या गावात कमळ फुलले' अशी बातमी दिल्यानंतर आरोप- प्रत्यारोपांना मोठे उधाण आले आहे. वृत्त प्रसिद्ध झाल्यापासून तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. बातमीत संस्था प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादीच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या गावातील स्थिती देण्यात आली आहे. मात्र, विविध संस्थांचे माजी प्रमुख असलेल्यांच्या गावातही राष्ट्रवादी पिछाडीवर आहे. यात बाजार समितीचे माजी सभापती रामचंद्र चौधरी (खोर), भास्कर देवकर (देवकरवाडी), सागर फडके (हातवळण) व बाळासाहेब थोरात (वाळकी), दौंड पंचायत समितीचे माजी सभापती मीना धायगुडे, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष भानुदास नेवसे, पुणे प्रादेशिक बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब किसन सोडनवर, असंघटित कामगार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष संजय धायगुडे (सर्व बोरीपार्धी), पंचायत समितीचे माजी उपसभापती उत्तम आटोळे (रावणगाव) व आशा डेंबळकर (देऊळगावगाडा), खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष सुभाष बोत्रे (पारगाव), ओबीसी महिला सेलच्या तालुकाध्यक्षा ज्योती झुरंगे (पाटेठाण) यांच्या गावांचा पिछाडीत समावेश आहे.

पंचायत समितीचे माजी सभापती रंगनाथ फुलारी (गिरीम) व झुंबर गायकवाड (केडगाव) यांनी थोरात यांना लक्षणीय मताधिक्‍य दिले आहे. नंदादेवी गावात जिल्हा परिषदेने पाण्याची टाकी बांधली; परंतु अनेक वर्षे ती वापरात नाही. याची नाराजी मतदानातून दिसल्याचे सांगण्यात येत आहे. दौंड शुगर कारखान्याच्या आलेगावात कुल यांना आघाडी आहे.

लोकसभेला पिछाडी विधानसभेला आघाडी...
दौंड तालुक्‍यातून लोकसभेला खासदार सुप्रिया सुळे यांना अनेक गावांनी कमी मताधिक्‍य दिले आहे. मात्र, याच गावांनी रमेश थोरात यांना मोठी आघाडी दिली आहे. हे असे घडले, याबाबत राष्ट्रवादीने संबंधित पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली पाहिजे, अशाही तक्रारी होऊ लागल्या आहेत. एकूणच राष्ट्रवादीची अंतर्गत धुसफूस यानिमित्ताने चव्हाट्यावर आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com